नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ५

मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे.

आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी
ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी
नवान्न पानं गुड वैकृतम् च
प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !!

ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस.
ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच जाड आहेत, काहीही व्यायाम करीत नाहीत, मुद्दाम खुराक देऊन वाढवलेले, माजवलेले आहेत, अश्या प्राण्यांचे मांस खाणे हे प्रमेहाचे कारण आहे.

प्रमेह हा मूळ रोग. त्याचे एकुण वीस प्रकार त्यातील कफामुळे होणारे दहा, पित्तामुळे होणारे सहा आणि वातामुळे होणारे चार वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील वाताच्या प्रकारातील एक प्रकार म्हणजे मधुमेह.

हा मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे, काय सावधगिरी बाळगावी, हे सांगताना शास्त्रकारानी खूप छान संकल्पना मांडल्या आहेत. विषय फक्त मांसाशी संबंधीत असल्यामुळे त्याच संकल्पना इथे बघू.

वर वर्णन केल्यापेक्षा वेगळे मांसाहारी प्राणी, म्हणजे जंगली प्राणी. सुक्या कोरड्या जागी रहाणारे, सतत धावणारे, म्हणजे व्यायाम करणारे, गरजेनुसार पाणी पिणारे, अंगावर कमी चरबी असणारे प्राणी. या जंगली प्राण्यांचे मांस आणि आनूप प्रदेशातील प्राण्यांचे मांस यांच्या गुणातील सूक्ष्म फरक द्रष्ट्या शास्त्रकारांनी अभ्यासला होता, निरीक्षण केले होते, कदाचित भविष्यात काय होणार हे त्यांना आधीपासूनच माहीत होते, म्हणूनच एक सावधानतेचा इशाराच जणु त्यांनी देऊन ठेवला होता.

आयुर्वेदात मांसाहार निषिध्द सांगितलेला नाही. हे आपण आगदी पहिल्या लेखात पाहिले होते. मधे मधे पण त्याचा उल्लेख करीतच होतो,

भविष्यात रोग होऊ नयेत, यासाठी कोणते मांस खाऊ नये, हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. हे अश्या प्रकारचे मांस खाल्ले की कोणते रोग होणार यांच्या यादीत प्रमेहाचा, मधुमेहाचा क्रमांक वरचा आहे.

त्याकाळी सूत्र सांगून ठेवले, ते आजच्या काळानुसार अभ्यासले की कोणते मांस खावे आणि खाऊ नये हे स्पष्ट होत जाते.

ज्या प्राण्यांना सतत कोंडून ठेवले जाते, तयार अन्न त्यांना सतत दिले जाते, स्वतःचे अन्न स्वतःच शोधायचे असते, हा नियम न पाळणाऱ्या, म्हणजेच खुराड्यात कृत्रिमरीत्या वाढवल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांचे मांस आनूप प्रकारात येते. हे मांस सतत खाल्ले की प्रमेह होण्याची शक्यता काही पटीने वाढते, हे लक्षात येते. प्रत्यक्षातही तसेच दिसते.

या खुराड्यात वाढवलेल्या प्राण्यांचे पोषण मुद्दाम मांस खाण्यासाठी केलेले असते. म्हणून त्यांना दिवस रात्र सतत खायला दिले जाते. त्यांना लहान जागेत ठेवले जाते. जेणेकरून ती हालचाली कमी करतील, व्यायाम होणार नाही आणि नंतर त्यांचे वजनही वाढेल.
पशुपक्ष्यांचे वजन वाढवणे, हाच एकमेव बिझनेस असल्यामुळे खुराडे मालकांना तेच करावे लागते, जे त्यांना सांगितले गेले आहे.
मग ती ब्राॅयलर कोंबडी, बदके असोत वा, बकरे डुकरे असोत.
त्यांचे जास्तीतजास्त वजन कसे वाढेल हेच मालक पहाणार.
पण त्याचा परिणाम पुढे खाणाऱ्यांना भोगावाच लागणार. प्रमेह वाढणार.

तो वाढलेला आहेच, असं जागतिक आरोग्य संघटना अगतिकपणे सांगतेय.

पण इथे विचार करायला वेळ कोणाकडे आहे ?
पैसा फेकला की जसे टाॅनिक विकत मिळते, तसे आरोग्यही विकत मिळते, असे वाटणारी मंडळी काही कमी नाहीत.
सगळेच अगतिक…
वेळेला बांधलेले….
आयुष्याची गती कमी केलेले…..

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
5.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..