“कुणाला दोन शब्द शहाणपणाचे,उपदेशाचे सांगायला कोणी गेले की, ” तू ते सांगू नको.मला सगळं माहीतच आहे;” असे जास्तीत जास्त अशिक्षित, अनपढ, गवार, मुर्ख व बिनडोक लोकं म्हणतात. याचे कारण त्यांची क्ष्रवणशक्ती, ग्रहणशक्ती विकसित झालेली नसते. काही सुशिक्षीत, क्ष्रिंमत, अधिकारी, कर्मचारी व व्यवसायी लोकं ऐकून घेण्याच्या, मनस्थितीत नसतात.विशेषत: त्यांच्या उणीवांवर,दोष-दुर्गुणांवर बोट ठेवलेले खपवून घेत नाही. ते टिका, टिपण्णी,आरोप व विरोधात शिव्याशाप बिल्कुलच सहन करीत नाही. पण त्यांच्या फायद्याचे मात्र त्यांना बरोबर ऐकू येते. आंधळ्यांना सुद्धा निर्विघ्न ऐकू जाते हे एक नवलच आहे! याचा अर्थ सुशिक्षित वर्गाने सुद्धा पाहीजे तसा त्यांच्या क्ष्रवण व ग्रहणशक्तीचा विकास केला नाही अशाच होतो.
निसर्गत:च प्रत्येक सजीव प्राणी व मनुष्याला ऐकण्यासाठी दोन डोळे, दोन कान , एक नाक, जीभ व एकच तोंड असते. असे मानू या की दोन डोळे पहाण्यासाठी, दोन पाय चालण्यासाठी, दोन हात स्वसंरक्षणासाठी व दोन कान हे ऐकण्यासाठी दिलेले असतात. तर एक जीभ चवीसाठी, नाक श्वासोश्वास आणि गंध जाणण्यासाठी अन् एकच तोंड खाणे, चावणे व बोलणे या क्रियांकलापासाठी मीळालेली असावीत. याचा अर्थ असा की जगण्यासाठी कान, डोळे व हातांचा उपयोग हा जास्तीत जास्त करावा लागतो.पण जे शारीरिक इंद्रीय एकमेव व एकच दिलेले आहे त्याचा उपयोग जरा जपूनच गरजेनुसार करायचा आहे. पण व्यवहारात लोकं जसे दुर्मिळ वस्तुचा वापर जास्त व सहज सुलभ वस्तुचा वापर कमी करतात.तसेच एकेरी इंद्रीयाचा उपयोगही लोकं अधिक करतात. म्हणजे मनुष्याच्या बाबतीत बोलायाचे झाल्यास कानाच्या तुलनेत तोंडाचा उपयोग बोलण्यासाठी फार करतात, ज्याला तोंडाची ‘वाफ धाडणे’ असे म्हणतात. मातृभाषेत बोलता सहज येते. जन्मत:च लहान मूल ‘ आई’, ‘पॉ’ म्हणणे शिकते. त्यासाठी त्याला कोणत्या शाळेत जावून शिकवणी लावण्याची गरज पडत नाही. त्यासाठी विशिष्ट भाषा, शिक्षण,आवाज, संस्कार, संकेत, शब्दसंग्रह आणि व्याकरणाची गरज भाषत नाही! परिणामकारक व चांगले बोलणे ही एक कला आहे. Listening is an art and good communication is a skill. त्यालाच संवादकौशल्य असे म्हणतात.
योग्य संवादाने समोरील व्यक्तीला संमोहीत, प्रभावीत व आपलेसे करता येते.आपले म्हणणे एखाद्या व्यक्तीला परिणामकारक व प्रभावीपणे पटवून देता येते. व्यक्तीच्या गळी उतरविता येते, ज्यामूळे क्लिष्टातील क्लिष्ट प्रश्न अथवा समस्या सोडवली जावू शकते. कोणताही कुठलाही विषय हळू आवाजात, हळूवारपणे म्हणजे ध्वनी वारंवारंतेचे भान ठेवून समोरासमोर कमी अंतरावरून बोलून मांडला तर उत्तम! पण त्यासाठी अगोदर ऐकणे शिकावे लागते. ऐकूच येत नसेल तर तो विषय वेगळा! ऐकूनच घ्यायचे नसेल तर तो विषय त्याहून आणखी वेगळा! जर ऐकता आले तर विषय,आशय,विचार,भावना अन मतमतांतरे, मतभेद व मनभेदही समजतील. ते समजले तर व्यवस्थित बोलता येतील. पण योग्यप्रकारे ऐकून न घेतल्यामुळे लोकांचे अनेक गैरसमज, मतभेद निर्माण होतात.कारण ते विषय समजूनही घेत नाही अन् उमजूनही घेत नाही. कान आणि तोंड याच्यामध्ये दोन बोटाचे अंतर आहे असे म्हणतात. म्हणजे काय की ऐकीव माहीती व सांगीव माहीती यांमधे खूप तफावत असते.
त्यामूळे मूळ विषय,समस्या बाजूला राहून नवीन समस्या तयार होतात. त्यांचे परिणाम आणि स्वरूप बदलुन जाते. निर्णय, निश्चय आणि निष्कर्ष बदलतात. घट्ट रक्ताचे,मैत्रीचे नाते तुटून जाते.बोलण्या पेक्षाही ऐकण्याचे प्रशिक्षण अतिआवश्यक आहे. अडाणी व अशिक्षित लोकांना जिथे बोलभाषेची सोय नाही तिथे ते ऐकशिल कसे? अर्थात सरसकट सगळ्या लोकांना हे मत लागू नाही. काही अशिक्षित लोकं हे ऐकण्यात कुशाग्र बुद्धीचे असतात. त्यामूळे ते ऐकण्याच्या कलेत पांरगत होणार कसे? जर लोकांना व्यवस्थित ऐकताच येत नसेल तर व्यवस्थित बोलता कसे येईल? सांगता कसे येईल? त्यांना समझता अन् समझाविता तरी कसे येईल बरे!. ज्याला आपण गोधंळ उडणे किंवा गैरसमज होणे असे म्हणतो. कारण उच्चारावरून बोल , बोलण्यावरून शब्द व शब्दावरूनच अर्थ कळतो.
पण त्यासाठी योग्य तर्हेने ऐकता आले पाहीजे नां ? जशी बोलभाषा तशीच शरीरभाषा आहे ! सांकेतिक भाषाही महत़्वाची आहे. एकही शब्द न उच्चारता व कोणत्याही खाणाखुणा न करता अबोलपणे अगदी मुकाट्याने बोलता व ऐकता येते. याची उत्तम उदाहरणे म्हणून मुके सजीव प्राणी पहा! गाय बैल,शेळी, मोर लांडोर, वाघ, हरीण, पक्षी, साप, विंचू, कावळे- बगळे, भोर व टिटवी यांचे गुणगुंजन पहा! वीजेचा कडकडाट किंवा ढगाची मेघगर्जना पहा! इथे वेगळाच सुरसंवाद, आवाज ऐकायला मीळतो.असो माणूस खूप शिकला,अनुभवी व क्ष्रिंमत झाला म्हणजे त्याला योग्य प्रकारे बोलता व ऐकता येईलच याची काहीही शास्वती नाही. पण ज्याला ऐकता येत नाही त्याला बोलता पण येत नाही हे पक्के! गीत, गायन, भजन,जलसा,काव्य कोणाला आवडत नाही? गीत गाणे, ऐकणे तर प्रत्येकालाच आवडते. पण संगीत ऐकता आले पाहीजे. त्यातील कमी जास्त उंचीचे स्वर, लय, मृदगंम,नोट्स,विविध वाद्यांची जुगलबंदी, कोरस यांची एकूणच बैठक ऐकता व समझता आली पाहीजे; ज्याद्वारे आपण आपल्या क्ष्रवण,ग्रहण व स्मरणशक्तीचा विकास करू शकतो. ग्रीक तत्ववेता प्लेटो म्हणतो की, ‘ संगीत ऐकल्याने माणसाची स्मरणशक्ती व क्ष्रवणशक्ती वाढते.’ अनेक दिवसाच्या तपश्यर्येने, प्रयत्नाने व अनुभवाने ऐकणं शिकता येते. ऐकणं शिकले की मग कुठेही अन् कोणाशीही व्यवस्थित बोलता येते. त्यासोबत व्यक्ती बाकीचा शिष्टाचार शिकूनच जातो.”
लेखक:हिम्मत बनसोड ता.२१सप्टेंबर २०२३
अमरावती.मो.9284241047
Leave a Reply