नवीन लेखन...

धुक्यात विमानप्रवास कसा होतो?

भारताच्या काही भागात हिवाळ्यात सकाळी काही वेळा पावसाळी हवामान असेल तर पूर्ण दिवस धुके असते. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होते. धुके जेवढे दाट तेवढे लांबचे कमी कमी दिसते. काही वेळा धुके एवढे दाट असते की अगदी एखाद-दुसऱ्या मीटर लांबीवरचेही काही दिसत नाही. अशा वेळी गाडी चालवणेच काय पायी चालणेही अवघड होऊन बसते, मग अशा वेळी विमानोड्डाणाची काय कथा?

विमान धावपट्टीवर उतरवणे आणि उड्डाण करणे धोक्याचे ठरते आणि मग उड्डाणे रद्द करावी लागतात. दिल्ली आणि उत्तरेतल्या विमानतळावर हिवाळ्यात ही परिस्थिती बऱ्याच वेळा येते. मुंबईत ऐन पावसाळ्यात अशी परिस्थिती कधी कधी येते. उड्डाणे रद्द झाल्याने देशी-परदेशी प्रवाशांचे खूप नुकसान होते. त्यामुळे अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टिम वापरली जाते. विमानात आणि जमिनीवर अशी उपकरणे ठेवल्याने समस्या सुटते. स्पष्ट दिसावे म्हणून आपण काही वेळा डोळे ताणून पाहतो तसे वाईट हवामानात हे उपकरण ताणलेल्या डोळयाचे काम करते. जमिनीवर संदेश घेणारे आणि विमानात संदेश देणारे उपकरण असते.

जमिनीवर धावपट्टीशेजारी जमिनीला समांतर लोकलायझर बसवलेला असतो, त्यात दोन अँटेना असतात. त्या वेगवेगळया लहरींवर संदेश पाठवतात. या अँटेना धावपट्टीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसवलेल्या असतात. कंपनसंख्या बरोबर असते तेव्हा तो संदेश विमानातील उपकरणात पोहोचतो आणि त्याप्रमाणे योग्य अशा सूचना वैमानिकाला मिळतात. यामुळे वैमानिक धावपट्टीच्या रुंदीच्या मध्यावर विमान उतरवू शकतो. अशीच यंत्रणा विमानाचे उड्डाण होत असताना होते.

विमान वर चढताना आणि खाली उतरताना मार्गदर्शन करणाऱ्या यंत्रणेबरोबरच मार्गदर्शन अंतराबाबत करण्यासाठीची यंत्रणाही असते. या उपकरणाची पहिली चाचणी १९२९ मध्ये अमेरिकेत झाली. पण प्रत्यक्ष ती विमानावर बसवली गेली ती १९३८ मध्ये. मात्र तोपर्यंत अशी यंत्रणा हाताने चालवावी लागे. १९६४ मध्ये ती स्वयंचलित झाली. आता मात्र मायक्रोवेव्ह सिस्टिम वापरात येऊ लागली आहे.

– डॉ. अविनाश वळवडे, पुणे
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..