नवीन लेखन...

ऐरणीच्या देवा… कथा एका अजरामर मराठी गीताची..!

ऐरणीच्या देवा तुला……चित्रपट : साधी माणसं

कथा एका अजरामर मराठी गीताची..!

जगदीश खेबुडकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला अनेक लोकप्रिय गाणी दिली आहेत, जगदीश खेबुडकर यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’ या गाण्याचे बोल कसे सुचले, या गाण्याची कथा खेबुडकरांनी सांगितली होती, ती अतिशय रंजक आहे.

भालजी पेंढारकर यांनी आपल्या आगामी ‘साधी माणसं’ या चित्रपटात खेबुडकरांची गाणी घ्यायची नाहीत असं ठरवलं होतं.

खेबुडकर म्हणतात की भालजी पेंढारकर हे उत्तम गाणी आणि संवाद लिहणारे होते, त्यांनी साधी माणसं साठी स्वत: तसेच योगेश यांची गीते घेतल्याची बातमी त्यांनी वर्तमान पत्रात वाचली होती.

या दरम्यान कोल्हापुरात खेबुडकरांचा शिक्षकी पेशा असल्याने ते वर्गात शिकवण्याचं कामंही उत्तम पद्धतीने पार पाडत होते. मराठी चित्रपटांची त्या काळी कोल्हापुरातच मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असे, असाच एकदा तास रंगात आला होता, पण अचानक शिपाई आला आणि म्हणाला, ‘तुम्हाला हेडमास्तर बलिवत्यात’.

जगदीश खेबुडकर मुख्याध्यापकांकडे गेले, त्यांनी सांगितलं उपाध्यक्षांचा फोन आहे, बोला.
फोनवर प्रत्यक्षात भालजी पेँढारकर बोलत होते, ते म्हणाले,

‘जगदीश असशील तसा निघून ये.’

खेबुडकर म्हणाले,

“मी तासावर आहे, पुढचा तास ऑफ आहे, तेव्हा येतो”.

पण त्यानंतर ते हेडमास्तरांशी भालजी काय बोलले माहित नाही.

खेबुडकरांना हेडमास्तर म्हणाले,
“तुम्ही आताच निघा, मी पुढचा शिक्षक तासाला पाठवतो”.

खेबुडकरांनी सायकलीवर टांग टाकली आणि स्टुडिओत हजर झाले.

खेबुडकर भालजींना म्हणाले,
“बाबा, काय बोलावणं?”

भालजी म्हणाले,
“अरे जगदीश, मी साधी माणसं करतोय.”

तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले,
“हो, मला माहित आहे, गीतंही तुमचीच आहेत”.

भालजी यावर म्हणाले,
“हो, मी काही गीतं लिहिली आहेत, पण एका गाण्यासाठी अडलंय”.

खेबुडकर यावर म्हणाले,
“कोणतं हो गाणं?”

“मला एक ‘थीम साँग’ हवं आहे, ‘तुझं गाणी घ्यायची नाहीत, असा प्रयत्न करून लिहतोय, पण या एका गाण्यावर अडलंय’, असं भालजी पेंढारकर यांनी जगदीश खेबुडकरांना सांगितलं.

भालजींनी खेबुडकरांना साधी माणसं चित्रपटाची कथा ऐकवली. लोहारकाम करणारं जोडपं, नवऱ्याबद्दल तिच्या भावना, लोहारांचा देव, त्यांना वाहिली जाणारी फुलं… असं काहीतरी भावनात्मक आलं पाहिजे असं भालजी खेबुडकरांना सांगत होते.

“गरीबीत सुद्धा त्यांना आनंद आहे, गाण्यात ते आलं पाहिजे, त्यांचा व्यवसायाचा त्यांना मनापासून अभिमान आहे, हे ‘थीम साँग’ वर्षानुवर्ष गाजलं पाहिजे, असं गाणं पाहिजे…” असं सांगून त्यांनी खेबुडकरांना विचारलं,
“कधी आणून देशील?”

खेबुडकरांना कसला उशीर नव्हता, ते म्हणाले,
“बाबा तुम्ही कथा सांगत होता, तेव्हाच डोक्यात ओळी छापल्या जात होत्या, कागद नाहीय माझ्याजवळ, कागद आणि पेन द्या.”

भालजींनी कागद आणि पेन दिलं, यानंतर खेबुडकरांनी गाणं लिहण्यास जागीच सुरूवात केली.

प्रथम गाण्याचा मुखडा आणि ध्रुवपद हे समर्पकपणे यावं लागतं, गाणं मुखड्यामुळेच लक्षात राहतं, असं खेबुडकर म्हणत.

‘ऐरण आणि ठिणगी-ठिणगी…’

या प्रमाणे खेबुडकरांना भालजी पेंढारकरांचे शब्द आठवले, लोहारांचा देव ‘ऐरण’ आणि फुलं कोणती तर कोळशातून उडणाऱ्या ‘ठिणग्या’.

बाजूच्या खोलीत बसलेल्या खेबुडकरांनी ओळी कागदावर उतरवल्या आणि अख्खं गाणंच लिहून काढलं.

आणि हे गाणं अजरामर झालं…!

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी-ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.

जयश्री गडकर भाता ओढतांना म्हणते…

लक्ष्मीच्या हातातली, चौरी व्हावी वर-खाली इडा-पिडा जाईल आली, किरपा तुझी भात्यातल्या सुरासंगं गाऊ दे.

जयश्री गडकर नवऱ्याबद्दल बद्दल म्हणते…

धनी मातुर माझा देवा, वाघावाणी असू दे …

नायक सूर्यकांतला पाहून वाघ गाण्यात आला…

ऐरणीच्या देवा तुला,
ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुजी,
आम्हांवरी ऱ्हाऊ दे…

लेऊ लेनं गरीबीचं,
चनं खाऊ लोकंडाचं,
जीनं व्होवं आबरूचं,
धनी मातुर माजा देवा
वाघावानी असू दे…

लक्‍शिमीच्या हातातली
चवरी व्हावी वर-खाली
इडी पीडा जाइल,
आली किरपा तुजी,
भात्यातल्या सुरांसंग गाऊ दे…

सुक थोडं, दुक्क भारी,
दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी,
सोसायाला, झुंजायाला
अंगी बळ येउ दे…!!!

खालील लिंकवर जरूर पहा :

— उदय गंगाधर सप्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..