ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० रोजी नाशिक येथे झाला. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला.
तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर परळ आणि डिलाइल स्ट्रीटवर दोन दुकानं होती. ३५० चौ. फुटांच्या जागेत, तेरा-चौदा जण राहत होते. अवीनाश नारकर घरातील सर्वात लहान. त्या वेळी अविनाश नारकर नाटक, चित्रपट, मालिका व डिबग करायचे. अनेक इंग्रजी मालिकांना त्यांनी हिंदी, मराठी आवाज दिलाय. ‘अल्लाद्दीन’ मालिकेतला इयागोचा आवाज अवीनाश नारकर यांचा आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांकडे मराठी सिनेसृष्टीतील अगदी सोज्वळ कपल म्हणून पाहिलं जातं. अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये हे दोघ आहेत. तसेच मालिकांमध्येही यांनी काम केली आहे. या सुखांनो या ही त्यांची गाजलेली मराठी मालिका आहे. याशिवाय ‘बेटियाँ’ या हिंदी मालिकेतही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली होती.
‘सून लाडकी या घरची’ या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून ‘चॅम्पिअन्स’ या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाचे विशेष कौतुक झाले. ऐश्वर्या नारकर हा जाहिरातींमधीलही प्रसिद्ध चेहरा आहे. ऐश्वर्या नारकर यांनी माझे मन तुझे झाले या मालिका, गंध निशिगंधाचा, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ही नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो असे चित्रपट केले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply