कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. अजित कडकडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या मनात गाण्याचा कसलाही विचार नव्हता. मला डॉक्टहर व्हायचे होते. परंतु पं. अभिषेकीबुवांमुळे मी या क्षेत्रात आहे. मा.आर.एन.पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. मा.अजित कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत.
दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे. अजित कडकडे आणि संगीतकार मा.नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. अजित कडकडे यांनी अनेक भावगीतेही गायली आहेत..
हे हासणे गुलाबी..
सजल नयन नीत धार..
मैफलीचे गीत माझे..
अशी सुमारे दहा..
तुझ्या कृपेने दिन उगवे..
भक्तिवाचुनि मुक्तीची मज..
अशी कित्येक भक्तिगीते..
तर चक्क
“चल गो चंपा..” हे कोळीगीतही गायले आहे.
“आर. एन. पराडकर” यांची भक्तीगीतांची व्हर्शन्स त्यांनी खास आग्रहाखातर केली हे विशेष.. मा.अजित कडकडे यांना “संगीतकार प्रभाकर पंडित स्मृती पुरस्कार‘ मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ लोकसत्ता
Leave a Reply