नवीन लेखन...

अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला.

परिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत त्यांची ओळख ” अजित दादा’ म्हणूनच आहे.

अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते. अजित पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी खरेदी विक्री संघामध्ये नोकरीला होते तर आजी शारदाबाई या काटेवाडीतील शेती सांभाळात असत.

शरद पवार त्यंच्या भाषणातून नेहमी त्यांच्या आईचा म्हणजेच शारदाबाईंचा उल्लेख करतात. तर याच माऊलीचे संस्कार अजित पवारांनाही मिळाले आहेत. सर्व सामान्य कुटुंबात वाढलेल्या अजित दादांचे आयुष्य सुरूवातीला अत्यंत सामान्य आणि हाल अपेष्टांमधून गेले. त्यामुळे मानवी जीवनातील दुःख, दारिद्य, अडचणी यांची पुरेपुर जाण अजित पवार यांना आहे.

अजित पवारांचे शालेय शिक्षण देवळाली प्रवरा येथे झाले. त्यानंतर ते मुंबईत त्यांचे काका शरद पवार यांच्याकडे दहावीनंतरच्या शिक्षणासाठी आले. तोपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीने चांगलाच वेग घेतला होता. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करून दादांनी पुन्हा बारामती गाठली या कर्मभूतीतील सहकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरवात केली. थोड्याच वेळात अजित पवारांनी या क्षेत्रात चांगली पकड घेतली. यानंतर १९९१ ला त्यांची पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्याचवर्षी ते विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी निवडूनही आले. या विजयानंतर त्यांना कृषी, फलोत्पादन आणि उर्जा राज्यमंत्री झाले. त्या बरोबरच त्यांनी एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस १९९९ मध्ये सत्तेत आल्यानंतर अल्पावधीत सरकार आणि संघटना या दोन्ही ठिकाणी अजितदादांनी आपला प्रभाव वाढवला.

अजितदादांनी २०१४ पर्यंत राज्यात विविध खाती सांभाळली. प्रशासनावर वचक असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पक्ष कार्यकर्त्यांना त्यांची कारभाराची कार्यक्षम शैली आकर्षित करते. पाच वेळा बारामतीचे आमदार म्हणून विक्रमी मतांनी विजयी होणाऱ्या अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलला. राज्यातून २०१४ नंतर पक्षाची सत्ता गेल्यानंतर अजितदादा स्वस्थ बसलेले नव्हते. ‘राजकीय जीवनात चढउतार होत असतात. सत्तेचा कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नसतो. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वस्थ बसायचे नाही,’ असा त्यांचा कार्यकर्त्यांना सांगावा असे. सरकार असो अथवा नसो अजित पवारांनी त्यांच्या नावाचा दबदबा राजकीय वर्तुळात कायम ठेवला आहे. शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्यात आणि सुप्रिया सुळेंमध्ये स्पर्धा असली तरी अजित पवार ते दाखवून देत नाहीत.

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना अजित पवारांनी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली होती. दारूबंदीच्या निर्णयाला पाठिंबा, आधुनिक शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयांना प्रोत्साहन, नगर-विकास, पंचायत राज व्यवस्थेत सर्व घटकांना सामावून घेणं, शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नाची मांडणी करणं या सगळ्यांत अजित पवारांचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. सध्या राज्यात कोरोनाचं संकट असताना अजित पवारांनी पायाला भिंगरी लावून परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री पदाने अजित पवारांना कायम हुलकावणीच दिली आहे. तगडी खाती पदरात पाडून घेताना राष्ट्रवादी पक्षाने १५ वर्षं उपमुख्यमंत्रीपदच आपल्या वाट्याला घेतलं. सध्याच्या सत्ता-संघर्षात राष्ट्रवादीने स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवलीय एवढं मात्र नक्की.

त्यांनी उद्धव ठाकरे सरकार मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम केले होते. सध्या शिंदे सरकार मध्ये ते देवेंद फडवणीस यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..