हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून.
अजित हा आमच्या शाळेचा म्हणजे ठाण्यातील एम.एच हायस्कुलचा. त्याला विचारले तुझा जन्म कधी झाला तर तो म्हणाला जन्म ११ ऑक्टोबर १९५७ रोजी झाला , अमिताभ बच्चन ची आणि माझी जन्मतारीख एक आहे.
त्याने अनेक ऍड एजन्सीमध्ये काम केले परंतु त्याचे पॅशन म्हणजे संगीत, गाणे त्याच्या नसानसात होते. . त्याने असे क्षेत्र निवडले निवृत्त झाल्यावर तुम्ही आस्चर्य व्यक्त कराल. तो मोठं मोठ्या हॉटेल्स मधून गातो. जस्ट करोके च्या तालावर गाणी इतकी सुरेख गातो की आताही विरारला हॉटेलमध्ये सहा ते साडेसहा वर्षे गात आहे. ते हॉटेल त्याला काही सोडायला तयार नाही. तो म्हणतो मस्त पैकी दुपारी २ ला निघतो रात्री दोन ला घरी ठाण्याला.
खरे तर हॉटेलमध्ये गाणे दुय्यम समजले जाते परंतु असे शेकडो कलाकार आहेत ते मस्त पैकी हॉटेल्स मध्ये गातात. प्रत्येकजण चित्रपटात किंवा इतर गाण्याची वाट बघत असतात परनु अजित कुणासाठी थांबला नाही ,त्याने स्वतःच्या घरातच सिस्टिम्स घेऊन सुरवात केली आणि आज त्याचे गाणे इतके श्रवणीय आहे की त्याला तोड नाही, तो नक्कल करत नाही तो त्याच्या आवाजात गातो, संगीताबरोबर . लोकांना ते सोपे वाटते परंतु असे करोकेवर गाणे गा म्हणजे कळेल काय पुढे जाते आणि काय मागे येते ते, तेथे अत्यंत अचूकता लागते. खरे तर त्याला मी म्हणालो तुम्ही असे करोकेवर गाणे गाता कसे माझ्या दृष्टीने ते टूथपेस्टमध्ये जास्त बाहेर आलेली पेस्ट आत भरण्याइतके जिकिरीचे आहे, तेव्हा तो म्हणाला सवय करावी लागते , त्याचा देखील वेगळा रियाज असतो. तो करावा लागतो आणि त्याने आजपासून एक उपक्रम सुरु केला ठाण्यामध्ये त्या उपक्रमाचे कर्यक्रमामध्ये उदघाटन केले त्याचा मित्र सुप्रसिद्ध सतारवादक चारुदत्त नायगावकर याने.
अजित सातघरेचे तो छोटा क्लास काढण्याचे ध्येय काय आणि त्याचे विद्यार्थी कोण असतील याचा जरा विचार करा , कोण असतील तर चक्क सीनिअर सिटिझन्स. रिटायर झाल्यानंतर प्रचंड वेळ मिळतो. त्याचे करायचे काय, बहुतेकांना गुणगुणण्याची आवाड असतेच परंतु नोकरीच्या , संसाराच्या व्यापातून त्याला कधीच वेळ मिळालेला नसतो. त्याच्या त्या इच्छा तशाच दाबून रहातात. स्त्री असो पुरुष असो निवृत्तीनंतर फक्त बेबी सिटीग्ज करावयाचे का ? अनेकांची मुले परदेशी असतात , त्यांना सहा महिने तेथे बोलवतात का, तर बेबी सिटीगसाठी ? निवृत्त झाल्यानंतर त्यांना त्याचे आयुष्य जगता आले पाहिजे . अडचणी , आजारपण असतेच परंतु काही काम नाही म्हणून जे मनाचे आजारपण असते ते घातक असते हे अजितला समजले आणि त्याने हा क्लास म्हणा शिकवणी वर्ग काढला आहे, ठाण्याच्या तलावपाळीवर अनेक सिनिअर सिटिझन्स छान पैकी दरोरोज साडेसात ते ९ पर्यंत गाणी गातात त्यांनाही अजित मदत करतो, माईक कसा धरावा , कसे उभे रहावे हे शिकवतो. अजित म्हणतो गाताना माईक कसा तोंडाशी धरावा ही देखील आर्ट आहे.वेगळे आहे ना हे सगळे……
आज खूप सिनिअर सिटिझन्स होते तेथे ,त्यांनी गाणी म्हटली.खरेच अजित सातघरेचा हा उपक्रम सॉलिड आहे…सॅल्यूट अजित..
मुद्दाम अजित सातघरे याचा भ्रमणध्वनी देत आहे…विचारा त्याला…कसे जगायचे ते…अजित सातघरे ..९९२०९९६२४७
— सतीश चाफेकर
Leave a Reply