नवीन लेखन...

अजून त्या झुडपांच्या मागे

सदाफुली दोघांना हसतें सदाफुली नांवाप्रमाणे सदा फुलत असतें.आपला हक्क सांगणारी माणसेही बोलत नाहीत, खुलत नाहीत पण सदाफुलीला कुठे सांगावं लागतं फुल म्हणून ती न सांगताच फुलतें. सदाफुलीला भावना नाहीत कसं म्हणावं आजी गेले की ती हिरमुसतें आणि येणार म्हणले की फुलतें. पाणी देणारं हक्काचा माणूस आजी शिवाय कोण असणार? गजऱ्यात नसलं तरीही देव्हार्‍यात सदाफुलीला स्थान असतं. सदाफुली सतत फुलत असतें. सतत फुलत राहण्याचे व इतरांना फुलत ठेवण्याचे हे लक्षण माणसें विसरतात.

इर्षा, द्वेष यानं सुरू होणारा अनेकांचा दिवस कसा हसरा राहील? वनस्पतींना भावना असतात पण इर्षा आणि द्वेष नसावें बहुदा. अनेक माणसांचा दिवस बदला कसा घ्यायचा या विचारात जातो, तर फुलांचा दिवस अनेकांमध्ये कसा बदल घडवून आणायचा या मध्ये जातो.आपल्या मुलाला घास भरवण्यासाठी सुद्धा वेळ आज काही आया देऊ शकत नाही कारण त्यांना कामा बाहेर घरातून बाहेर पडावं लागतं.

संवादासाठी तोंड न उघडणारे माणसें वादासाठी तोंड उघडतात. समजून उमजून सदा फुलणं माणसाला नाही जमत. प्रसंगानुसारच माणसें फुलतात. प्रेयसीला गजरा हवाच असतो त्याशिवाय ती फुलत नाही.
कुठून येतं हे फुलणं? प्राप्त परिस्थितीत झाडं वाढतच असतात, फुलतच असतात. माणसांना का नाही जमत? फुलण्यासाठी सुखासीन परिस्थिती असताना सुद्धां माणसें कोमेजलेलीच कां असतात?
झाडांचं संचीत फक्त जमीनच असतं म्हणूनच त्यांचे पाय जमिनीवर असतात की काय? एकेका वनस्पतीचे, फुलांचे आपल्या जीवनात फार महत्त्व असतं.

आपलं आयुष्य कोण फुलवेल हे सांगता येत नाही. कुणाच्या आयुष्यात मोगरा फुललां प्रमाणे त्यांचं आयुष्य सतत फुलत जातं. कुणी सतत हासरा चेहरा ठेवून सदाफुलीप्रमाणे आपल्याला खुलवत असतं. कुणी रातराणीच्या सुगंधाप्रमाणे आपल्या आयुष्यात सतत प्रसन्नता आणतं, आपल्याला मोहवून टाकतं.
चाफा बोलेना असं आपण जरी म्हणत असलो तरी न बोलता इतरांचे मन कसं सुगंधी आणि प्रसन्न करावं हे त्याच्याकडून शिकायला हवं. मेंदूला जाणाऱ्या संदेशाने माणसं घडतात. एखादा अवयव व परत नसेल तर मेंदू त्याच्याशी कट्टी करतो, त्याला नाकाम करतो. स्नायूंना पुन्हा वापरात आणलं, फुलवलं की मेंदू सुद्धा सुखावून जातो आणि पुन्हा स्नायूला साद घालतो. आज अनेक जण फिजियोथेरपीमुळे मुळे पूर्ववत होऊन आनंदी आयुष्य जगत आहेत. संगीत सुद्धा आज थेरपी झाली आहे माणसांना बरं करणारी. फुलांचे स्पर्ष आपल्याला एका वेगळ्याच राज्यात घेऊन जातात. बालवयात सुध्दा स्पर्ष माणसाला घडवतं. चुकीचे स्पर्ष आयुष्य उध्वस्त करतात. वात्सल्याच्या स्पर्षात लोळलेली मुले एकदम निवडुंगाच्या स्पर्षाने कोमेजून जातात. लहानपणी टोचणारे स्पर्ष क्षणीक असलें तरी आयुष्यभर मोठ्या जखमा करून जातात. तारुण्य हे सुगंधी जखमां जपण्याचे वय असतं.

कोणतंच मागणं न मागता जगायचं कसं, हसायचं कसं हे सदाफुली कडून शिकायला हवं. सदाफुलीची कुठे तक्रार असते, मला प्रेयसीच्या गजऱ्यात का नाही माळलं, मला देव्हाऱ्यात कां नाही स्थान दिलं. फक्त हसत राहायचं एवढा गुणधर्म सदाफुलीकडून घेण्यासारखा आहे. उमलायचं ते कोमेजून जायचं या प्रवासात फक्त हसायचं. जगण्या आणि मरण्याच्या प्रवासात हसणं तुम्हाला तारुन नेतं, दुःखावर मात करायला शिकवतं, मनाला विरंगुळा प्राप्त करून देतं, मन हलकं करतं. फुलांनी आमचं भाव विश्व इतकं समृद्ध केलं आहे की दुःखाच्या बोचणाऱ्या काट्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. मोगरा फुलला सारखं आम्हाला आयुष्य फुलवायचं आहे. चाफा बोलेना म्हणत प्रेयसीच्या गालावरची खळी खुलवायची आहे.
केतकीच्या मनामध्यें मोर नाचला गं बाई तसं आमच्याही मनात मोर नाचायला हवा तरच आनंदाचं थुई थुई पण आम्हाला अनुभवायला मिळेल. रातराणीच्या गंधासारखी सर्व दूर आमचे यश व कीर्ती पोहोचायला हवी.

काही सुगंधाची दखल घ्यावीच लागते तसंच काही यशाची ही दखल घ्यावीच लागते. सुवासाला जाहिरातीची आवश्यकता नसते तसंच यशाचं आहे. आपलं अंगण रितं ठेवून दुसऱ्यांच्या अंगणात फुलांचा सडा पाडला तरच सुगंध आपल्या अंगणात दरवळतो, ही वृत्ती प्राजक्ताची आपल्याला बरंच काही सांगून जाते. दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करा म्हणजे आपण आपोआप आनंदी होतों. जाईन विचारत रानफुलां भेटेल तिथे सजण मलां. इथेही माणसापेक्षा फुलावर विश्वास. प्रत्येक फुल काहीतरी शिकवतं,सुचवतं.

फुलांसारखे शब्दही जपून ठेवायला हवेत.वहीत असलेलं फुल वाळलेलं असलं तरी कधीच मरत नाही. ते आठवणीचं मोरपीस प्रमाणे मनाला शहारें आणतं. फुलं आठवणी ताज्या करतात. या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस कां? जळीस्थळी प्रेयसीला शोधण्याचे एक वय असतं. माणसांपेक्षा फुला वर माणसें जास्त विश्वास टाकतात.फुलं म्हणजे देवाशी संवाद साधणारी, प्रेयसीला रिझवणारी, व्यक्तिमत्त्वाला उंची देणारी, हसवणारी आणि जीवनात आनंदाचा शिडकावा करणारी असतात. फुलांना जपणं म्हणजे मनाला जपणं असतं. मन जपलं की व्यक्तिमत्व बहरतं. जीवनावर आरक्त होता आलं पाहिजे जीवनात प्राजक्त होता आलं पाहिजे आनंदी जीवनाची हीच आहे गुरूकिल्ली. अजून त्या झुडप्यांच्या मागे सदाफुली केवळ हसत नाही तर जीवनाचे तत्त्वज्ञान सांगते.

डॉ.अनिल कुलकर्णी
९४०३८०५१५३

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 39 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..