आकाशाशी स्पर्धा करणे,
हीच मातीची ओढ असे,
खालून मुळ्यांची पेरणी,
झाडाझुडपांचा पायाच असे,
वाढावे असेच उदंड,
खालून वरवर जावे,
कितीही वर गेलो तरी,
पायाला न कधी विसरावे,
गगन विस्तीर्ण भोवती,
बुंध्यातून वाढीस लागावे,
फांद्या पाने ,फुले यांनी,
खोडास सतत बिलगावे,
झाड लेकुरवाळे असते,
तरी किती निस्संग,—!!!
एक निळाई त्याच्या डोळी,
दुसरा न कुठला रंग ,–!!!
हिरवे असून, आसमानी जाई,
अवती भोवती किती लेकरे,
सोडून सगळ्या ऐहिक गोष्टी, मोक्षाचा फक्त माग काढे,–!!!
फांद्या, पाने, फुले सारे,
शिकती सारे झाडाकडुनी, दुसऱ्याला देऊन टाकणे,
स्वार्थ कधी नसतोच मनी,–!!!
म्हणूनच का एवढे जाते,
उंचावरती पसरत ते ,——?
कुठून आणे तटस्थ वृत्ती,
संन्यस्त अश्वत्थ बनते,–?
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply