नवीन लेखन...

अक्कल दाढ ????

(कथा आणि पात्र काल्पनिक आहे)

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.

आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.

मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का?

डॉक्टर मिस्कील हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीवघेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील, काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळाठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. पोंर ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आपल्या सौभाग्यवतीला घेऊन, भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल.

माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट.

डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. घरी जाऊन मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो.

आरश्यात मला माझा चेहरा काळाठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.

(दात तोड डॉक्टर मित्रांकडून प्रतिसाद अपेक्षित)

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..