नवीन लेखन...

आक्रंदन

काही अटळ गोष्टी कधीच होऊ नयेत असतात आशा वेड्या
येतात ते क्षण सामोरे जेव्हा उडतात भ्रमाच्या चिंधड्या चिंधड्या

नसते तयारी मनाची , बीभत्स विद्रुप सत्याला भिडण्याची
समूळ उन्मळण्याची , उरी फुटण्याची , आत्यंतिक आक्रंदनाची

धडपड संपण्यापूर्वी , अखंड असहाय तुम्ही धडपडताना
वाटतं प्रचंड वैषम्य की येऊ शकलो नाही तुमच्या कामाला
बाळगाव्या उरी बोचणाऱ्या वांझ वेदना की निरंतन घुसमटवणारी जाणीव
की करावी आपल्याच आपण potent न्यूनतेची उसासून कीव

If you couldn’t be helped in your intensely weak moments When I was around watching , desperately helpless well I guess , I ought to be guilty by choice , for life

अगतिकतेच्या कडेवरुन भासतो भास्करही तो त्रयस्थ अन् दुबळा
काळीज चिरीत निघालेला काळोख व्यापुन उरतो विश्वाला सगळ्या
आसवांच्या साठवांना तेव्हा बांध विवेकाचा नाही पेलत
येतात अचानक प्रवाहाचा घेऊन वेग प्रचंड , ओसंडत

सुटला नाही अजून आतड्यांना आतून पडलेला पिळ
उठवते वारंवार काळजात एक परिचित खोलवर कळ
जागत्या ठुसठुसणाऱ्या वेदना नि गद्गद्णारे हुंदके
भळभळणाऱ्या जखमा नि बापुडवाणी पोकळी व्याकुळ

बऱ्याच झाल्या बेरजा वजाबाक्या तरीही आयुष्यफळा भासतो मोकळा
त्रैराशिक हुकले जगण्याचे , चुकलाच आमचा वेळेचा ताळा
काही असतील झाल्या तरीही बऱ्याच उरल्या होत्या गप्पा
स्पंदनांना काही फुटलेले पाय ; उरल्या होत्या तरीही आंतरिक कळा

भेटू आपण जेव्हा होऊन एकदा एकदम गोळा
होऊ या मोकळे मनसोक्त रडून गळ्यात घालून गळा

घंटेच्या घनगंभीर नादाने भानावर आलो जेव्हा
रात्र टळून गेली होती …..
सुकत आलेले जडावलेले डोळे मी उघडले तेव्हा
कोवळी सूर्यप्रभा नुकती पसरत होती

खूप काळ उलटून गेला असावा
कोंबडाही केव्हाचा आरवला असावा
आता उठायलाच हवे , नाही का ?

उरलेले अश्रू गोठवून मनाचा दगड करुन उठताना
मी जेव्हा माझ्या क्षौर केलेल्या डोक्यावरुन हात फिरवला तेव्हा
छोटे छोटे सफेद केस त्यावर केव्हाचे उगवले होते

-यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..