नवीन लेखन...

‘अलबेला’ फेम मास्टर भगवान

मास्टर भगवान यांचे पूर्ण नाव भगवान पालव. मास्टर भगवान यांचा जन्म १ ऑगस्ट १९१३ रोजी झाला.

गव्हाळ वर्ण,अपुरी उंची,चौकोनी रापलेला चेहरा,बटबटीत डोळे,लालपिवळे दात या दादांच्या रुपावर कोणती नायिका भाळणार आणि ते कधी काळी चित्रपटाचे नायक होतील यावर कुणाचा विश्वास बसला नसता, पण दादांच्या मेहनतीने ते घडवलं.

मास्टर विठ्ठल हे दादांचे दैवत…!

१९३० मध्ये दादांना कॉमेडियन म्हणून ‘बेवफा आशिक’ हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र ‘बेवफा आशिक’ या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी आपल्या ‘जनता जिगर’ या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला. या चित्रपटानंतर त्यांच्या पाच मुकपटात भगवानदादांनी काम केलं. ‘हिम्मते मर्दा’ या पहिल्या बोलपटात भगवानदादांनी काम केले. इथुनच भगवानदादांना धडाधड चित्रपट मिळत गेले. मात्र १९५० पर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू व सुशिक्षित सिनेदर्शकात दादांच्या चित्रपटांना स्थान नव्हते.

१९५१ ला रिलीज झालेल्या ‘अलबेला’तील एकाहून एक “सुपरडुपर हिट’ गाणी आणि त्यावरील खास “भगवान-डान्स’ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील ‘भोली सुरत दिल के खोटे’ हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्थाला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. भारतीय सिनेमात खऱ्या अर्थानं पाश्चाुत्य संगीत आणि डान्स रुजवण्याचे काम भगवानदादांच्या “अलबेला’नं केलं. भगवानदादा यांचं “अलबेला’चं हे यश मात्र “एकमेवाद्वितीय’ ठरलं. त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले.. पण एकाही सिनेमाला यश मिळालं नाही.

दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. “चोरी चोरी’, “झनक झनक पायल बाजे’ या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या. नृत्य-संगीताचा अभिनव आविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला “पहिला डान्सिंग ऍक्टीर’ -अर्थात्‌ भगवानदादा या सिनेमानं मिळवून दिला.

भगवान दादांच्या जीवनावर आधारीत ‘एक अलबेला’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. भगवानदादा यांचे ०४ फेब्रुवारी २००२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..