डायनामाईट” या स्फोटकाचे संशोधक आणि नोबेल पारितोषिकाचे जनक आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. २१ ऑक्टोबर १८३३ स्टॉकहोम येथे झाला.
आल्फ्रेड नोबेल या स्वीडिश रसायनतज्ज्ञाने ‘डायनामाइट’ या स्फोटकाचा शोध लावला होता.त्यांच्या डायनामाइट स्फोटकासाठी त्यांना १८८७ साली फ्रान्समध्ये पेटंट मिळाले होते. त्याआधी स्फोटक म्हणून नायझोग्लिसरीनचा वापर केला जायचा. पण ते द्रवरूपात असल्याने त्याचं लवकर बाष्पीभवन व्हायचं. त्यावर मात करण्यासाठी आल्फ्रेडनी नायट्रोपर्लसरीन आणि सिलिका वाळूचे संयुग मिसळले आणि डायनामाइट नावाची पेस्ट तयार केली. त्याकाळी खाणकामासाठी या अद्भुत स्फोटकाचा खूप गवगवा झाला होता. नायट्रोग्लिसरीन या जबरदस्त स्फोटकामुळे १८६४ मध्ये आल्फ्रेड नोबेलची फॅक्टरी उडवली होती. त्यात पाच जण दगावले होते. आणि त्या दुर्दैवी जीवांमध्ये त्याचा धाकटा भाऊ एमिलदेखील होता. नायट्रोग्लिसरीनचा शोध १९४७ मध्ये इटालियन संशोधक रसायनतज्ज्ञ एस्कानियो सोब्रेरो यांनी लावला होता. हे स्फोटक गरम करण्याआधीच त्याचा स्फोट होत होता. त्याची फॅक्टरी भस्मसात झाल्यावर स्वीडिश सरकारने त्यांना ती पुन्हा उभारण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे आल्फ्रेडनी आपले संशोधन सुरू केले व त्यात ते यशस्वी झाले.
प्रारंभी भुसभुशीत दगडात हे नायट्रोग्लिसरीनचे तेल मिसळून त्यांनी काहीशी सुरक्षित स्फोटकं तयार केली. नंतर त्यात सुधारणा करून काडीच्या रूपात तसेच ग्रीस-रोधक कागदात गुंडाळलेले स्फोटक तयार केले आणि त्याला डायनामाइट नाव दिले. त्यांनी उपयोजित केले जेलिग्नाइट हे स्फोटक तर नायट्रोसेल्युलोज आणि सोडिअम नायट्रेटपासून तयार केले जाते व ते साठवून ठेवण्यास सुरक्षित असते. या स्फोटकाच्या जनकाने आपला मृत्यूचा व्यापारी म्हणून संभावना होऊ नये म्हणून क्षालनासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, फिजिओलॉजी किंवा वेधकशास्त्र, साहित्य आणि (समाज) शांती या क्षेत्रांत मानवतेच्या कल्याणार्थ उल्लेखनीय कामे करणा-या संशोधकांना नि साहित्यिक समाजधुरिणांना पारितोषिक देण्याची प्रयोजना १९०१ पासून केली.
डायनामाईटचा दुरुपयोग या जगात विध्वंसक कार्यासाठी होण्याची भीती आल्फ्रेडला नेहमीच असायची. वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो गंभीर आजारी झाला. मरणापूर्वी आल्फ्रेड नोबेल यांनी स्वतःची मालमत्ता, संपत्ती आणि पैसा मिळून ३१२२५.००० स्वीडीश क्रोनर ‘नोबेल पुरस्कार समिती’ ला दान केले. या पैशाला सुरक्षित रोख्यात गुंतविण्यात आले. या पैशातून दरवर्षी मिळणारं व्याज सहा भागात विभागून जगप्रसिद्ध संशोधन करणार्या व्यक्तींना किंवा संस्थांना देण्यात येते. हाच तो जगप्रसिद्ध असा “नोबेल पुरस्कार”.
१९६९ ला त्यात इकॉनॉमिक्सची भर घातली गेली. नोबेल पारितोषिक प्रदान करताना त्या व्यक्तीची किंवा संस्थानी केलेल्या कार्याचेच मूल्यमापन करण्यात येते. त्या व्यक्तीची जात-पात, धर्म, लिंग किंवा देश याचा विचार केला जात नाही. मरणोपरांत नोबेल पुरस्कार प्रदान करण्याची कोणतीही तरतूद घटनेत नाही.
आल्फ्रेड नोबेलने विस्फोटकांच्या शोधातून अमाप संपत्ती मिळविली आणि जगाने त्याची ‘मर्चंट ऑफ डेथ’ म्हणून निर्भर्त्सना केली असली तरी नोबेल पुरस्कार समितीची स्थापना करून त्याने मानवतेसाठी उदात्त असं कार्य केलं. नोबेल पुरस्कारावर कितीही टीका होत असल्या तरी दरवर्षी ऑक्टोबर महिना उजाडला की यावर्षी नोबल पारितोषिक मिळणार? याची उत्सुकता आजसुद्धा संपूर्ण जगात जागविली जाते यासाठी कारणीभूत ठरला होता तो १४ जुलै १८६७ चा ‘डायनामाइट’ या स्फोटकाचा यशस्वी प्रयोग.
नोबेल पुरस्कार हा जागतिक पातळीवरचा एक सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता अशा विविध क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. गणित विषयासाठी मात्र हा नोबेल पुरस्कार नाही…. पण का? याचाही एक मजेशीर किस्सा सांगितला जातो.
आल्फ़्रेड नोबेल आणि त्याचा एक मित्र एकाच कॉलेजात शिकत होते. कॉलेजच्या काळात अल्फ्रेड नोबेल आणि हा मित्र हे दोघेजण कॉलेजातल्या एकाच मुलीवर जीव टाकत होते! आल्फ़्रेड पुढे संशोधक झाला तर त्याचा मित्र पुढे मोठा गणिती झाला. बरेच दिवस ही मुलगी आपल्या मनाचा थांग लागू देत नव्हती……. आणि अखेर तिने कौल दिला तो गणितज्ञाच्या बाजूने! लवकरच त्यांचा विवाहसुद्धा पार पडला. यावर आल्फ़्रेडने निराश न होता उलट भरपूर पैसा कमवायचा आणि मग आपल्या श्रीमंतीला भुलून ती तरुणी परत आपल्याकडे येईल अशी स्वप्ने अल्फ्रेड बघू लागला. यातूनच पुढे ‘डायनामाइट’ प्रकरण घडले आणि त्यातून तो श्रीमंत बनला. पण खूप श्रीमंत झाल्यावरही अल्फ्रेडची कॉलेजसखी त्याच्याकडे परतली नाहीच! ती त्या गणितज्ञालाच एकनिष्ठ राहिली! नंतर जेव्हा नोबेल पुरस्कार देण्याचे ठरवले गेले तेव्हा विविध क्षेत्रांची नावे पुढे येऊ लागली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ….. अशी एकेका विज्ञान शाखेची नावं पुढे येत होती आणि अल्फ्रेड नोबेल मान डोलावत होता. आणि अचानक कोणीतरी सुचवलं, ‘गणित?’
आजवरचा त्याचा इतिहास आठवून आपली कठोर नजर रोखत नोबेल उत्तरला, “कदापि नाही! कोणाही गणितज्ञाला माझा पैसा मिळणार नाही!”
………आणि म्हणून गणितासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही!
आल्फ्रेड नोबेल यांचे १० डिसेंबर १८९६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply