एलियन्स या विश्वात कुठे राहतात हा एक माणसाच्या दृष्टीने असलेला व्यापक चर्चेचा विषय आहे. त्यांचे अस्तित्वात या विश्वात आहेत की नाही, ते आपल्याला पाहत आहेत की नाही, ते पृथ्वीवर आहेत का, असे काही प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहेत. एका स्वयंघोषित ‘टाईम ट्रॅव्हलर’नुसार, एलियन ८ डिसेंबर रोजी पृथ्वीवर उतरतील. खरच टाईम ट्रॅव्हलची व्याख्या करायची झाली तर एखादी व्यक्ती जी भूतकाळातील किंवा भविष्यातील वेगवेगळ्या काळात फिरू शकतो त्याला प्रामुख्याने टाईम ट्रॅव्हलर म्हणतात.
TikTok वापरकर्ता एनो अलारिक, जो एक स्वयंघोषित ‘टाइम ट्रॅव्हलर’ देखील आहे, याने कॅप्शनसह एक व्हिडिओ पोस्ट केला: “सावधान! होय, मी २६७१ सालचा एक वास्तविक-वेळ प्रवासी आहे, येणाऱ्या या पाच तारखा लक्षात ठेवा.” असे या टाईम ट्रॅव्हलरने कमेंट द्वारे हे विधान केले आहे.
स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाच अंदाज शेअर केले आहेत. या वर्षी डिसेंबरमध्ये मानव एलियनशी संवाद साधू शकतो, असे सर्वात लक्ष वेधून घेणारे विधान त्यांनी केले आहे . त्यांच्या म्हणण्यानुसार, ८ डिसेंबर रोजी एलियन पृथ्वीवर एका महाकाय उल्कामध्ये येऊ शकतात. मार्च २०२३ मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला ७५० फूट मेगा-त्सुनामीचा सामना करावा लागेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. हा माणूस २६७१ सालचा असल्याचा दावा करतो. .
एलियन लँडिंग व्यतिरिक्त, अलारिकने इतर अनेक गोष्टींचा अंदाज लावला. त्याने पुढील सहा महिन्यांत घडणाऱ्या इतर चार घटनांचाही अंदाज लावला, त्यातील पहिली घटना ३० नोव्हेंबरला घडण्याची शक्यता आहे. त्या दिवशी पृथ्वीचे अनुकरण करणारा एक नवीन ग्रह जेम्स वेब दुर्बिणी शोधून काढेल असे त्याने सांगितले. त्यानंतर, 8 डिसेंबर रोजी एलियनशी संवाद होईल.
तिसरा डावा हा ६ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे, जिथे किशोरांचा एक गट इतर आकाशगंगांमध्ये वर्महोल उघडण्यासाठी एक उपकरण शोधेल. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात, अलारिकने मारियाना ट्रेंचमध्ये प्राचीन प्रजातीचा शोध लागण्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनार्यावरील रहिवाशांना, विशेषत: सॅन फ्रान्सिस्को, 750 फूट मेगा-त्सुनामीचा तडाखा बसेल, असे त्याच्या शेवटच्या भविष्यवाणीत म्हटले आहे.
जरी या स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने अंदाज व्यक्त केले असले. तरी आतापर्यंत घोषित केलेल्या अनेक टाईम ट्रॅव्हलर्सचे विधानसिद्ध झालेली नाहीयेत . त्यामुळे या टाईम टेबल चे विधान खरे होते की नाही हा एक मोठा चर्चेचा विषय आहे !
— अथर्व डोके
सूचना – वरील लेखाशी लिहिणारा लेखक सहमत असेलच असे नाही.
Leave a Reply