अलका कुबल यांना आपण ९० च्या दशकातील यशस्वी सिने अभिनेत्री म्हणून ओळखतो. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९६३ रोजी झाला. शालेय वयापासून नाटकाची आवड असलेल्या अलका कुबल यांनी शालेय स्पर्धांत काम तर केलेच, पण त्यानी महत्त्वाचे नाटक केले ते म्हणजे “नटसम्राट’. या नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांच्या नातीची भूमिका त्यांनी वठवली होती. त्यानंतर “वेडा वृंदावन’ नाटकात काम केले. “नटसम्राट’मध्ये तर दत्ता भट यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केले.
विजया मेहतांबरोबरही त्यांनी “संध्याछाया’ नाटकात काम केले होते. विसाव्या वर्षी तिने मायानगरीत प्रवेश केला. आज मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करून तीस ते पस्तीस वर्षे पूर्ण झाली असतील तरी ही सुंदर अभिनेत्री या इंडस्ट्रीवर राज्य करीत आहे. १९९१ च्या काळात कोणत्याही प्रकारचा प्रमोशन फंडासारख्या गोष्टी नसतानादेखील ११८ आठवडे त्यांचा माहेरची साडी हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कल्ला करीत होता. अलका कुबल यांनी मराठी इंडस्ट्रीला ‘वहिनीची माया’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘लपवाछपवी’, ‘नातीगोती’ असे अनेक चित्रपट दिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply