पर्यटन, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटविणाऱ्या नाशिकचे महत्त्व देशपातळीवरच वाढत आहे. मनोरंजनाच्या क्षेत्रातही नाशिक आता झपाट्याने विकसीत होत आहे.
नाशिक आकाशवाणी केंद्राद्वारे ३१ ऑक्टोबर १९९४ मध्ये पहिले एफएम स्टेशन सुरु झाले. प्रसार भारतीच्या अखत्यारीत असलेल्या या स्टेशनचा पोहोच चांगला असल्याने ते चांगलेच लोकप्रिय बनले. मात्र, बदलत्या काळानुसार खासगी एफएम स्टेशन्सला परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार २००७ मध्ये नाशकात रेडिओ मिर्ची हे पहिले एफएम स्टेशन कार्यरत झाले. या स्टेशनमुळे नाशिककरांची काहीशी लाईफ स्टाईलही बदलायला सुरुवात झाली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये एफएम मशिन्स आणि रेडिओचा चांगलाच बोलबाला सुरु झाला. यास एक वर्ष उलटत नाही तोच साऊथ एशिया एफएमचे एस एफएम २००८ मध्ये नाशिककरांच्या सेवेत रुजू झाले. वर्षभरातच साऊथ एशिया एफएम कंपनीने त्यांच्याकडील स्टेशन्सचे नाव रेड एफएम असे केले.
सर्व श्रोत्यांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply