नवीन लेखन...

अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर

अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म १८ मार्च १९४८ रोजी झाला.

I will Out you bloody इंग्लंडचा “दादा’ फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांना उद्देशून भारताच्या एकनाथ सोलकर यांचे हे वाक्या क्रिकेट विश्वांमधील अजरामर “कोट्‌स’मध्ये नोंदविले गेले आहे.

अफलातून “क्लो.ज-इन फिल्डर’ असलेल्या एकनाथ सोलकर हे आकडेवारीने कोणताही पराक्रम दाखवू न शकणारी व्यक्ती, तरीपण त्यांची कसोटी क्रिकेट कारकीर्द तरीही एक असामान्य पर्व सांगणारी आहे. आठ वर्षे आणि २७ कसोटी सामने, एवढ्या छोट्याशा कारकिर्दीत एकनाथ सोलकर यांनी भारतीय संघाला एक वेगळे परिमाण गाठून दिले. व्यक्तिगत विक्रमांच्या कधीही मागे न लागता सोलकर सतत संघाच्या गरजेनुसार खेळ करीत राहिले. त्यामुळे अनेक सामन्यांत भारताची मानहानी टळली किंवा “ओव्हल’वरील १९७१ सारखा संस्मरणीय विजय नोंदला गेला.

एका ग्राऊंड्‌समनच्या मुलाने कसोटी क्रिकेटचे स्वप्न पाहणे समजण्याजोगे होते; पण सोलकरांनी ते वयाच्या विशीतच पूर्ण करत आणले. बाह्य मैदानातील सर्वांत चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची प्रसिद्धी होती; पण फिरकी चौकडीच्या गरजेसाठी ते फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे राहू लागले. विश्वा स बसणार नाही, असे झेल पकडू लागले. ओव्हलच्या ऐतिहासिक कसोटीत ऍलन नॉटचा त्यांनी घेतलेला झेल, हा निर्णायक क्षण होता, याबद्दल कधीच दुमत झाले नाही. भारतीय संघाला मध्यमगती गोलंदाजाची वानवा होती, तेव्हा सोलकर यांनी स्वतःच्या शैलीत बदल करून ती कमतरता भरून काढली. खालच्या फळीतील राखीव फलंदाज असताना ते वेळोवेळी मधल्या फळीत किंवा थेट आघाडीला येऊ लागले.

“मॅन ऑफ क्रायसिस’ हा किताब त्यांना ब्रिटिश वृत्तपत्रांनी दिला, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. एकनाथ सोलकर यांची कारकिर्द : २७ कसोटी १०६८ धावा, एक शतक, ६ अर्धशतके, १८ विकेट्‌स, ५३ झेल. ७ वनडे २७ धावा, ४ विकेट्‌स, २ झेल. १८९ प्रथम श्रेणी सामने, ६८९५ धावा, ८ शतके,३६ अर्धशतके, २७६ विकेट्‌स, १९० झेल.

एकनाथ सोलकर यांचे निधन २६ जून २००५ रोजी झाले.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..