२५ फेब्रुवारी २००१ रोजी सर डॉन ब्रॅडमन यांचे निधन झाले. त्याआधी सहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचा सार्वकालिक सर्वोत्तम संघ निवडला होता.
इथेही त्यांचे टाइमिंग जबरदस्त होते. ‘मुलाखती आणि प्रश्न किंवा स्पष्टीकरणांसाठी कुणी आपल्याकडे येऊ नये’ म्हणून आपल्या आयुष्याचा (हा) डाव संपल्यावरच हा संघ जाहीर करावा अशी त्यांची सूचना होती!
आताच्या पिढीतील खेळाडूंपैकी केवळ सचिन तेंडुलकरचा समावेश त्यांनी निवडलेल्या १२ खेळाडूंमध्ये होता. हा संघ असा होता – अर्थातच त्यात ब्रॅडमन होतेच.
दक्षिण आफ्रिकेचे बॅरी रिचर्ड्स आणि ऑसी आर्थर मॉरिस सलामीला, क्रमांक तीन खुद्द डॉन, क्रमांक चार सचिन तेंडुलकर, वेस्ट इंडीजचे गॅरी सोबर्स पाचव्या स्थानावर (ब्रॅडमनच्या मते सोबर्स हा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे), मग कांगारू यष्टीरक्षक डॉन टॅलन. वेगवान गोलंदाजांमध्ये ऑसी रे लिंड्वॉल, डेनिस लिली आणि इंग्लंडचा अलेक बेडसर. फिरकीपटूंमध्ये बिल ओ’रेली आणि क्लॅरी ग्रिमेट (या दोघांसोबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंची संख्या सात) आणि बारावा खेळाडू इंग्लंडचे वॉली हॅमंड (कव्हरड्राईव मारावा तर हॅमंडनेच अशी त्याची ख्याती होती!) कर्णधाराची निवड त्यांनी केलेली नाही पण एकेका सत्रासाठी सोबर्स आणि ब्रॅडमन यांनी कप्तानी सांभाळली असती तर शोभून दिसले असते!
वॉली हॅमंड, क्लॅरी ग्रिमेट, बिल ओ’रेली आणि रे लिंड्वॉल हे चौघे ब्रॅडमन यांनी संघ निवडण्यापूर्वीच कालवश झाले होते. एप्रिल २०१०मध्ये बेडसर गेले…‘टेस्ट प्रिमिअर लीग’ भरविणारी कुणी पॅकरसदृश असामी अजून भूतलावर जन्मली असल्याचे ऐकिवात नाही. कसोटी क्रिकेट हे खरे तर क्रिकेटच्या झटपट प्रकारांचे जन्मदाते आहे. कसोटी क्रिकेटच न टिकणे म्हणजे उंच वाढलेल्या झाडाला मुळापासूनच छेद देणे होईल- भाषेतील उद्गारचिन्हांसारखे !
डॉ. आनंद बोबडे लिखित `जागत्या स्वप्नाचा प्रवास’ या पुस्तकातील एक उतारा.
हे पुस्तक मराठीसृष्टीवर उपलब्ध आहे… छापील आणि इ-बुक स्वरुपात
हे पुस्तक सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा
Leave a Reply