एक अत्यंत गुणकारी भरपूर कॅल्शियम तसेच अनेक प्रकारची खनिजे बदामात असतात. विश्वास बसणार नाही इतके गुणकारी बदाम आहे. भारतात हा शोध चक्क महर्षी, ऋषींनी लावला. आशिया खंडात बदाम अत्यंत आश्चर्यजनकरित्या सापडला. इ.स.पूर्व १३२५ राजा तुतानखामेन यांनी बदामाचा शोध लावला. तरीपण अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे बदाम अगदी सर्वत्र ठिकाणी सापडते. बदामावर सातत्याने संशोधन सुरू आहे. कारण आहारशास्त्राच्या दृष्टीने बदाम हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण भारतामध्ये बदाम हे फार थोड्या प्रमाणात मिळते. काश्मीर व हिमाचल प्रदेशच्या काही भागात बदाम सापडतो. मात्र आशियाई खंडात बदानाची खूप प्रमाणात लागवड होते. तसेच अमेरिकेत कॅलिफोर्निया येथेही बदामाची लागवड प्रचंड प्रमाणात होते.
चुना म्हणजेच कॅल्शियम, बदाम येथे मोठ्या प्रमाणावर सापडते. १०० ग्रॅम बदामातून वजन करता त्यात ९९ टक्के एवढे कॅल्शियम सापडते. तसेच खनिज द्रव्ये बदामात खूपच सापडते. एवढेच नव्हे चुना खाल्ल्यास त्याचे लवकर विघटन होते व ते तसेच हाडात लेपासारखे वाढते तसेच रक्तात व इतर भागात चुना टिकून राहतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे बदामामध्ये कॉलेस्ट्रेरॉल अजिबात नसते. हे सर्व बालक ते तरुण व ज्येष्ठ नागरिकांना वरदान ठरते. लहान मुले सहा सात अथवा अधिक मुलांना बदाम खावयास दिले तर ते फार पोषक असते. हाडे जुळून मजबूत होतात व रक्तप्रवाह सुरळीत चालू होतो व ते ह्रदयालादेखील मिळते. अगदी तान्हा बाळांना सहा ते सात महिन्यात बदाम रात्रभर भिजत घालून त्याचे साल काढून सहाणीने दोन ते चार वेढे बाळाला दिल्यास शरीराची वाढ चांगली होते व मुले मजबूत व सडपातळ होतात. तसेच बदामातील खनिज द्रव्येदेखील भरपूर प्रमाणात मिळतात.
बदाम सर्वत्र मिळते तसेच बदाम लवकर खराब होत नाही. बंद डब्यात बदाम ठेवल्यास खूप दिवस टिकते अथवा बुरशीही येत नाही. बदाम कच्चे खाल्ले तरी चालतात. त्याने कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही.
बदामाचे उपयोग खालील प्रमाणे आहेत.
१. बदामाचे दूधः लहान मुले व तरुण व प्रौढांसाठी चांगले असते.
२. बदामाचे प्रकार: इतर श्रीमंत लोकांना चांगले असते त्यात आईसक्रिम बरोबर घेता येतात.
३. तसेच इतर जेवणातही बदामाचा उपयोग एक श्रीमंताचे खाणे म्हणून वापरतात.
४. बदामाचे तेल फार औषधी असते.
तोंडावर पुरळ अथवा बारीक पुळ्या असल्यास बदाम तेलात ते नाहीसे होते. तसेच पांढरे डाग असल्यास त्याचा खूपच फायदा होतो. शेवटी बदाम खाल्ल्याने त्याची प्रतिकारकशक्ती फार लवकर वाढते.
मुख्य म्हणजे जगातल्या कोणत्याही भागात बदाम अगदी सर्वत्र मिळते. मानवाच्या शरारीत चुना म्हणजे कॅल्शियम अगदी सर्वत्र असते. अगदी हाडापासून ते शरीराच्या अनेक भागात सापडते. म्हणजे जवळजवळ ९९ टक्के कॅल्शियम शरीरात उपलब्ध असते. जसे चूना संबंध शरीरात मिळते अगदी त्याचप्रमाणे शरारीत मिळणारे पाणी, रक्त तसेच ह्रदयाच्या बाजूने जाणारे असे अनेक प्रकारे चुन्याचा मारा सतत केला जातो. बदामाचा वापर सर्वत्र केला जातो. अगदी सहा महिन्यांच्या लहान मुलाला प्रथम चांगल्या प्रकारचे दोन बदाम ते रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवून त्याची साल काढून सहाणेवर दोन वेढे चमच्यात दिल्याने बाळ गुटगुटीत होते. हे वेढेपासून हळूहळू वाढत ठेवावे. व नंतर बाळ दोन ते तीन वर्षांनंतर बाळाला बदाम भिजवून खाण्यात द्यावे. याने बाळाचे हाड सडपातळ व मजबूत होतात व बाळाचे पोषण चांगले राहते. व ते हाडात लवकर मिसळत जाते. तसेच दात येण्यानंतर मुलांना बदाम पाण्यात भिजवून ते एक-दोन खाण्यास देणे आवश्यक असते.
– मदन देशपांडे
Leave a Reply