एक अत्यंत आयुर्वेदिक औषध म्हणजेच कोरफड. कोरफडला संस्कृतात घेकूनवार असे म्हणतात. कोरफड ही औषधी असून आजच्या युगात कोरफडला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. अगदी साबणाकरिता किंवा आपल्या तोडांवरी पुटकुळ्या अथवा तोंडावर कांती मऊ व मुलायम होण्याकरिता कोरफड सर्वत्र वापरतात. आणि आज त्याची जाहिरातही खूप करतात. खरे म्हणजे कोरफड हे उत्तर आफ्रिकेत प्रचंड प्रमाणात वाढते व तसेच स्पेन वगैरे युरोपियन देशामध्ये कोरफडाला खूपच मागणी असते. तसेच दक्षिण आशिया खंडातही कोरफड मिळते.
कोरफडचे विविध गुणधर्म आहेत. भारतात कोरफडाचा रस अथवा कोरफडाची जेली मिळते. कोरफड मात्र बहुपयोगी आहे.
१. जखम भरून येण्यासाठी: कोरफडाने कोणतेही जखम झाल्यास त्याने कोरफडाचे काटे बाजूला ठेवून त्याची हिरवी साल काढतात व त्या सालामधून पांढरा बलक दिसून येतो. तो लावला व फडके गुंडाळून ठेवल्यास जखम ताबडतोब बरी होते.
२. कांती सुधारणे: जर गालावर पुटकुळ्या अथवा पुरळ आल्यास कोरफडाने गालावर अथवा कपाळावर चोळावे. अर्धा तासाने पुरळ व कांती सुधारते.
३. अंगावर शरीराला कंड येणे, खाज येत असल्यास शरीराच्या कोणत्याही भागात सतत खाज येत असल्यास कोरफडाने बलक घेऊन ते कोठेही लावला कंज थांबतो.
४. जर पोट दुखत असल्यास कोरफडाने काटे काढून हिरवीचा बलक काढून त्यात थोडी हळद मिसळल्यास त्वरित आराम मिळतो.
५. जर एखादेवेळी शरीराला अथवा पोटऱ्या दुखत असल्यास कोरफडाचे पान घेऊन त्यातील गर व इतर पाणी देण्याने दुखणे ताबडतोब थांबता येते तसेच कोरफड हे अत्यंत गुणी औषध असून कोणताही विपरित परिणाम होत नाही.
६. दात दुखत असल्यास कोरफड दातावर चोळल्यास बरे वाटते.
७. गर्भवती स्त्री अथवा लहान बाळाला कोरफड कोणत्याही परिस्थितीत ठेवू नये. कोरफड अगोदर घेतल्याने कोरफडची बाटली भरून घेऊन त्यात थोडी हळद अथवा मधाचे मिश्रण करून दिवसातून तीन वेळा घेतल्याने सर्व प्रकारचे स्वास्थ्य वाटते.
कोरफडाचे ११ ग्रॅममध्ये खालील गुणधर्म आढळतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply