वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीला आपण मुत्राशयातील समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत.
वयोमानामुळे घडत जाणारे बदल
मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त वृद्ध स्त्रीयांमधील व्याधी नसून पुरुषांमधेही दिसून येते. खरे तर ही अडचण कोणत्याही वयात येऊ शकते. परंतु वृद्धत्त्वामधे सर्वात जास्त दिसते. मूळव्याध, बद्धकोष्ठ, काही ठराविक औषधे घ्यावी लागणे, मुत्राशयावर एखादा रोग-संचार (इन्फेक्शन) होणे अशी कारणे सुद्धा मुत्राशयावर संयम न रहाण्यासाठी पुरतात. मुत्रपिंडाचा एखादा स्नायू दुबळा झाला, मुतखडा (किडनी स्टोन) झाला, पार्किन्सन्स किंवा अर्थ्रायटीस सारखा मुत्रपिंडावरचा संयम जाऊ शकणारा आजार झाला तर काही वेळा त्यामुळे आलेली मुत्रपिंडावरची अस्वस्थता ही जास्त कालावधीसाठी टिकून रहाते. वृद्धत्वामधे लघवी करत असताना मुत्राशयातले स्नायू कधी कधी आकुंचित पावतात. त्यमुळे योनीमार्गात जळजळ होऊ शकते. आणि त्याच वेळी मुत्राशयाच्या आजुबाजूचे अवयव शिथील होतात आणि संयम नसताना लघवी होऊ शकते
Leave a Reply