विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला,
रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गाऊनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होऊन गेले काव्य, अमर राहिले आतां,
प्रसंग जरी तो गेला निघुनी, राहते जिवंत कविता ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply