नवीन लेखन...

आंबेहळद – एक औषधी

आंबेहळद ही प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते.

आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. ती पोटात देत नाहीत. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.

कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात.

शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

अंगावर खरका उठल्यास आंबेहळद, कडूजिरे गोमूत्रात वाटून लावतात. यामुळे हा त्रास कमी होतो. खरका म्हणजे अंगावर उठलेल्या बारीक पुळय़ा लचकणे, मुरगाळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात.

चिमूटभर आंबेहळद आणि मलई एकत्र करून चेहर्यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

— सुषमा मोहिते
Sushama Mohote

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

1 Comment on आंबेहळद – एक औषधी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..