जेष्ठ गायिका अमीरबाई कर्नाटकी बिजापूर जिल्ह्यातील बेलागी मध्ये जन्मल्या.
अमीरबाई यांचे संगीत आणि नाटक प्रेमी कालाराकारांचे घराणे. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्यांसनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला. अमीरबाई यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला तो गोहरबाईंमुळे.
अमीरबाई मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत सहजपणे काम करू लागल्या. त्या वेळेला कंपनी नाटक आणि हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील अनेक नट आणि गायक हे सुद्धा चित्रपटक्षेत्रात प्रवेश करत होते. अमीरबाई यांनी चित्रपटामध्ये पार्श्वगायन सुरु केले तेव्हा, मुबारक बेगम, सुरय्या, जोहरा अम्बालावाली, नूरजहाँ, शमशाद बेगम, उमादेवी यांसारख्या प्रसिद्ध गायिका होत्या. लता मंगेशकर तेव्हा लहान होत्या. त्या सर्वांमध्ये अमीरबाई त्यांच्या अपूर्व आवाजामुळे वैशिष्ट्यपूर्ण होत्या. बहुतेक १९४० चे दशक त्यांचे यशस्वी दशक ठरले. त्या किर्तीशिखारावर पोहचल्या ते ‘किस्मत’ (१९४२) या चित्रपटामुळे. भारतीय चित्रपट इतिहासात त्याने जमवलेला गल्ला (एक कोटी) हा त्यावेळचा विक्रमच होता. तो विक्रम त्यानंतर आठ वर्षांनी आलेला ‘आवरा’ या चित्रपटाने मोडला. ‘दूर हटो जी दुनियावालो’, ‘घर घर में दिवाली’, ‘धीरे धीरे आरे बादल’ ही त्या वेळची सुप्रसिद्ध गाणी होती. गायन त्यांचे खरोखरच अभिव्यक्तीचे रूप होते. मा.अमीरबाई यांचे गायन वैशिष्ट्य पूर्ण होते. त्या मागे मजरूह सुलतानपुरी यांसारख्याच्या रचना गाऊन प्राप्त केलेली साहित्यिक जाणीव, शास्त्रीय संगीताचे ज्ञान आणि तार स्वरामध्ये गाण्याचा रंगभूमी वरील सराव अशी अनेक कारणे होती. अमीरबाई यांनी मुख्यत्वे उल्हासपूर्ण गाणी गायली आहेत. लता बरोबर त्यांनी गायलेली गाणी (‘समाधी’) लोकप्रिय झाली होती. वहाब पिक्टुरेसच्यात ‘शहनाझ’ (१९४२) चित्रपटासाठी स्वतः अमीरबाई यांनी संगीत दिले.
अमीरबाईनी मराठी, मारवाडी, गुजराती चित्रपटामध्ये गायन केले. लता मंगेशकर ह्याच्या पार्श्वगायानाक्षेत्रातील प्रवेशानंतर अमीरबाई यांचे युग संपले.
अमीरबाई कर्नाटकी यांचे ३ मार्च १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Leave a Reply