अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी २० जुलै १९६९ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. तोपर्यंतच्या मानवी आयुष्यात कोणीही अशी कृती करू शकला नव्हता. मानवजातीच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. हा प्रसंग जेव्हा टेलिव्हिजनवर दाखविण्यात आला, तेव्हा जगातील १/५ लोकांनी तो बघितला. अपोलो-११ या यानाने १६ जुलै १९६९ रोजी सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली.
नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन, मायकेल कॉलिन्स हे ३ अवकाशयात्री यानात होते. तीन दिवस आणि दोन लाख ४० हजार मैल प्रवास करून २० जुलै १९६९ रोजी दुपारी १ वाजून ४७ मिनिटांनी ते चंद्रावर पोहोचले.
नील आर्मस्ट्राँग सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारे ठरले. या प्रसंगी त्यांची प्रतिक्रिया होती- दॅट्स वन स्मॉल स्टेप फॉर अ मॅन, वन जाएंट लीप फॉर मनकाइंड (एक छोटं पाऊल माणसासाठी तर मानवजातीसाठी मोठी झेप). अमेरिकेचा झेंडा त्यांनी रोवला आणि टेलिव्हिजन कॅमेऱ्याने चित्रीकरण केलं. चंद्रावरील काही नमुने घेतले, प्रयोग केले. साडेआठ तास या गोष्टी चालल्या.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply