अर्मा बॉम्बेक यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९२७ रोजी बेलब्रूक अमेरिका येथे झाला.
अर्मा बॉम्बेक या अमेरिकेन लोकांची अत्यंत लोकप्रिय आणि जिचं साहित्य प्रचंड वाचलं जातं, अशी प्रसिद्ध विनोदी कथाकार!
त्यांनी घरगुती प्रसंगावर आणि रोजच्या आयुष्यात नेहमी घडणाऱ्या प्रसंगांवर अत्यंत खुसखुशीत भाषेत मिश्कील लेखन करून प्रचंड लोकप्रियता मिळवली.
७० आणि ८०च्या दशकात त्यांचे ‘विट्स एंड’ हा सिंडिकेटेड कॉलम आठवड्यातून तीन वेळा जवळपास ९०० वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध व्हायचा. तिचं प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर असायचंच. मातृत्व आणि बालसंगोपन हे तिचे विशेष जिव्हाळ्याचे विषय होते आणि त्या संदर्भात तिचं धमाल विनोदी लेखन प्रसिद्ध व्हायचाच अवकाश, की लगेच त्याच्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या.
दी ग्रास इज ऑल्वेज ग्रीनर ओव्हर दी सेप्टिक टँक, इफ लाइफ इज ए बोल ऑफ चेरीज व्हॉट अॅम आय डुइंग इन दी पिट्स?, फॅमिली – दी टाइज दॅट बाइंड.. अँड गॅग, आंट एर्माज कोप बुक, मदरहूड दी सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन, अशी त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. अर्मा बॉम्बेक यांचे २२ एप्रिल १९९६ रोजी निधन झाले.
Leave a Reply