अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक पॉल न्यूमन यांचा जन्म २६ जानेवारी १९२५ रोजी ओहायो अमेरिका येथे झाला.
पॉल न्यूमन हे अमेरिकन चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक व शर्यतीतील कारचालक होते. पॉल न्यूमन यांनी आपल्या कारकिर्दीत ५० हुन अधिक चित्रपट केले. पॉल न्यूमन यांना आपल्या ५ दशकांच्या कारकिर्दीत ५ वेळा ऑस्करचे नामांकन लाभले होते.
१९६९ साली पॉल लेनर्ड न्यूमन हे २५ लाख डॉलर्स हे एका सिनेमाचे मानधन घेत असत, आणि निर्माते एक एक वर्ष आधी ते देऊन त्यांना आरक्षित करत असत.
पॉल न्यूमन यांना कलर ऑफ मनी या चित्रपटातील भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय एमी पुरस्कार, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
अभिनयातून निवृत्त झाल्यावर न्यूमन यांनी ‘न्यूमन्स ओन’ ही खाद्यपदार्थ बनविणारी कंपनी सुरू केली व त्यात होणारा सगळा फायदा दरवर्षी दान केला. त्याचा मृत्यूनंतरही ही प्रथा कायम आहे. २०१७ पर्यंत न्यूमन्स ओन कंपनी ने अंदाजे ४८ कोटी ५० लाख अमेरिकन डॉलर दान केले आहेत.
पॉल न्यूमन यांचे निधन २६ सप्टेंबर २००८ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply