अभिनेता चक नॉरीस यांचा जन्म १० मार्च १९४० रोजी रयान, ओकलाहोमा येथे झाला.
हॉलीवुडचे रजनीकांत अशी ओळख असलेले सुपरस्टार चक नॉरिस अभिनय क्षेत्रात येण्याआधी युनाइटेड स्टेट एयर फोर्स मध्ये नोकरी करत होते. अभिनया सोबतच चक नॉरिस एक प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट देखील आहेत. ‘तांग सू डो’, ब्राझिलियन ‘जिउ जित्सू’ आणि ‘जुडो’मध्ये त्यांनी ब्लॅक बेल्ट धारण केला आहे.चक नॉरीस हे आपल्या यूनीक एक्टिंगच्या मुळे पुऱ्या विश्वात प्रसिद्ध झाले. चक नॉरिस यांनी १९६९ मध्ये फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘द रेकिंग क्रू’. त्यानंतर त्यांची मार्शल आर्ट्सच्या एका परफॉर्मन्स दरम्यान ब्रूस लीची भेट झाली. १९७२ मध्ये त्यांनी ब्रूस लीच्या सोबत ‘वे ऑफ द ड्रॅगन’ हा चित्रपट केला. पुढे त्यांची लोकप्रियता पाहून मॅक्वीनने त्यांना १९७४ मध्ये एमजीएम स्टुडिओमध्ये ॲक्टिंगचे वर्ग घेण्यास प्रोत्साहन दिले.
‘वे ऑफ द ड्रॅगन’ व्यतिरिक्त, नॉरिस १९८० च्या दशकात ‘द कॅनन ग्रुप’चे प्रमुख स्टार देखील होते. त्यानंतर १९९३ ते २००१ पर्यंत त्यांनी ‘वॉकर’, ‘टेक्सास रेंजर’ या टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलेचक नॉरीस हे ४५ हून अधिक वर्षे हॉलीवुड फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करत आहेत. ‘वे ऑफ द ड्रैगन’ मध्ये चक नॉरीस यांनी ब्रूस ली यांच्या बरोबर काम केले होते. ‘कोड ऑफ साइलेंस’, ‘द डेल्टा फोर्स’ व ‘फायरवॉकर’ हे त्यांचे इतर गाजलेले चित्रपट.
चक नॉरिस आता ‘किकस्टार्ट किड्स’ नावाचा एक फाउंडेशन चालवतात ज्याचा उद्देश कराटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यां मध्ये आवड निर्माण करणे हा आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply