नवीन लेखन...

गीतकार,दिग्दर्शक, पत्रकार, पटकथाकार, निर्माता, कॉर्पोरेट व्यवस्थापक अमित खन्ना

गीतकार,दिग्दर्शक, पत्रकार, पटकथाकार, निर्माता, कॉर्पोरेट व्यवस्थापक अमित खन्ना यांचा जन्म दि. १ मार्च १९५१ मुंबई येथे झाला.

सरदारी बेगम’, ‘मनपसंद’, ‘देस परदेस’, ‘लूटमार’ अशा डझनभर चित्रपटांचे निर्माते किंवा कार्यकारी निर्माते, ‘मनपसंद’मधल्या ज्या गाण्यांमुळे टीना मुनीम गाजल्या त्या गाण्यांसह कित्येक गीतांचे कवी आणि मुख्य म्हणजे चित्रवाणीवर जेव्हा वृत्तवाहिन्यांचा सुळसुळाट झाला नव्हता, त्या काळात दूरदर्शनच्या प्रेक्षकांपुढे विविधांगी मालिकांचा नजराणा ठेवणारे चित्रवाणी-निर्माते अशा विविध नात्यांनी अमित खन्ना परिचित आहेत.अमित खन्ना हे ख-या अर्थाने अष्टपैलू गीतकार.ते केवळ गीतकारच नाही, तर दिग्दर्शक, पत्रकार, पटकथाकार, निर्माता, कॉर्पोरेट व्यवस्थापक अशा अनेक भूमिका त्यांनी लीलया पार पाडल्या आहेत. हे सर्व करत असताना अवीट गोडीची अनेक अविस्मरणीय गाणी अमित खन्नांनी दिली आहेत. दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमधून इंग्रजी विषयातील पदवीधर असलेल्या अमित खन्ना यांनी हिंदीवरचे प्रभुत्व आपल्या अनेक गाण्यांतून वेळोवेळी सिद्ध केले आहे.दिल्लीत प्रारंभीच्या काळात त्यांनी अनेक नियतकालिकांसाठी पत्रकारिता केली. गाण्याची लहानपणापासून आवड असणा-या अमित यांना मुंबईत खरा ब्रेक दिला तो एव्हरग्रीन स्टार देव आनंद यांनी आपल्या नवकेतन बॅनरमध्ये.देव आनंद निर्मित ‘शरीफ बदमाश’ व ‘देस पसदेस’ या चित्रपटांचे सहायक दिग्दर्शक म्हणून अमित खन्ना यांनी काम पाहिले. त्यांच्यातील प्रतिभा पाहून देव आनंद यांनी ‘देस-परदेस’च्या गीत लेखनाची जबाबदारी अमित यांच्याकडे सोपवली.
नजराना भेजा है किसीने प्यार का, आप रहें और हम ना आये, जैसा देस वैसा भेस, नजर लागे ना साथियाँ, ‘देस परदेस’मध्ये यासारखी एकाहून एक सरस गाणी देत अमित खन्ना यांनी देव आनंद यांचा विश्वास सार्थ ठरवला. ‘देस परदेस’ पासूनच अमित आणि संगीतकार राजेश रोशन यांचे सूर जुळले.या गोड समीकरणातूनच रसाळ गाणी जन्माला आली. लोगों का दिल अगर, रहने को एक घर, कभी शादी ना करो, चारू चंद्रा की चंचल चितवन, मै अकेला अपनी धून मे मगन (सर्व मनपसंद) यातून हे सूर आणखी सुरेल झाले. मग बासू चटर्जींच्या ‘बातो बातों मे’मधून या जोडीने आणखी दर्जेदार कामगिरी करत रसिकांची मने काबीज केली. यातील ‘सुनिए कहिए’, ‘ना बोले तुम’, ‘उठे सबके कदम’, ‘कहाँ तक ए मन को’ अशा एकाहून एक सरस गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. बासूजींच्याच ‘स्वामी’मधल्या अमित खन्ना यांच्या गाण्यांची महती काय वर्णावी. ‘का करू सजनी आये ना बालम’ हे येसुदास यांच्या आवाजातले गाणे असो, की ‘यादों मे वो’मध्ये ठेवणीतला आवाज वापरणारा किशोर असो; आजही ही गाणी हेलावून टाकतात. त्यावर कडी म्हणजे, लतादीदींच्या आवाजातले ‘पल भर में ये क्या हो गया, लो मै गयी वो मन गया’, ‘चुनरी कगे सुन री पवन सावन लाया अब के सजन’, ‘दिन भर मुझे ये सताए, उन बिन अब तो रहा नही जाए…’ त्याच्या विरहाने व्याकूळ झालेल्या तिच्या मनाची अवस्था अमित खन्ना यांनी ज्या शब्दांत गुंफली आहे, त्याला जोड नाहीच. अमित यांच्या लेखणीची जादू पाहा- तिची ही विरहावस्था मांडताना त्यांची लेखणी जशी मुलायम होते, तशीच ती आक्रमकही होते. ‘लुटमार’मधल्या ‘जब छाये मेरा जादू, कोई बचना पाय’मधून याचे प्रत्यंतर येते.अमित खन्ना यांनी २०० हून अधिक गाणी त्यांनी लिहिली आहेत. तसेच त्यांनी बुनियाद, देख भाई देख, स्वाभिमान सारख्या मालीकांची शीर्षक गीत लिहिली आहेत.
राजेश रोशन प्रमाणेच बप्पी लाहिरी यांच्यासमवेत अमित खन्ना यांनी अशीच लोकप्रिय गाणी दिली आहेत. ‘चलते चलते’ हे त्याचे उत्तम उदाहरण. यातील प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, जाना कहाँ है, दूर दूर तुम रहो… अशी सर्वच गाणी गाजली. सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर, सबूत, गुदगुदी, अविनाश अशा अनेक चित्रपटांतून या जोडीने गाणी दिली.
अमित खन्ना यांनी खरी कमाल केली ती ‘भैरवी’मध्ये. लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांच्या संगीताने सजलेल्या अमित खन्नांच्या लेखणीतून अवतरलेल्या भैरवीतील गाण्यांनी रसिकांना पुन्हा एकदा केसरी सुगंधाचा आस्वाद दिला. भैरवीतील ‘बलम केसरिया’, ‘चलरी पवन’, ‘बीच भँवर में’, ‘कुछ इस तरह से’ अशा गाण्यांनी अमित खन्ना ही काय चीज आहे, याचे प्रत्यंतर रसिकांना आले. रामसे बंधूंच्या ‘पुराना मंदिर’ या भयपटातही ‘वो बिते दिन याद है’सारखे आशयघन गाणे देणा-या अमित खन्ना यांच्या शब्दांची जादूच अशी निराळी व कायम स्मरणात राहणारी आहे.‘प्लस चॅनेल’ ही कंपनी १९८९ मध्ये अमित खन्ना यांनी काढली,पुढे ती रिलायन्सने विकत घेऊन खन्नाचा यांना प्रमुखपदी ठेवूनच त्यांनी या क्षेत्रात पाय रोवले. रिलायन्स एंटरटेनमेंटसारख्या कॉर्पोरेट कंपनीचा सर्वेसर्वा ते अनेक टीव्ही सिरियल्सचा लेखक, गीतकार म्हणून अमित खन्ना यांचे योगदान महत्त्वाचे आहे.त्यांनी ‘वर्डस्, साऊंड्स, इमेजेस : अ हिस्ट्री ऑफ एंटरटेनमेंट इन इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे.

Website http://www.amitkhanna.in/
काजय कुलकर्णी

संकलन-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..