महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार यांना WhatsApp वरील एका लेखकाने लिहिलेले खुले पत्र..
माननिय पवार साहेब.
नुकतेच कुठल्यातरी ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आपण उपस्थित होता असे कळले. तिथे आपण नेहमीप्रमाणे तुमच्या प्रचंड ऐतिहासिक अभ्यासाचे दाखले दिले.
आपण म्हणालात की महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते हा मुद्दा एकदम मान्य हे तर सगळेच मान्य करतात. पुढे असेही म्हणाला की अफजल खानला (साहेबांनी उल्लेख अफजु खान असा केला) फाड़ला तसे कृष्णा कुलकर्णीला ही उभा कापला. साहेब हे सुद्धा अगदी मान्य. पण हे सांगत असताना तुम्ही चंद्रराव मोरे, खंडोजी खोपडे, बाजी घोरपडे ही नावे तुमच्या अभ्यासु भाषणातुन कशी चुकली हाच आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे. तसेच कृष्णा कुलकर्णी (ज्याला कुणीच काडीचीही किंमत देत नाही) ला कापल्याचे दाखले देत असताना शिवरायांनी त्यांच्या अष्टप्रधानमंडळामध्ये आठ पैकी सात मंत्री ब्राह्मण नेमले होते हेदेखील तुमच्या प्रचंड अभ्यासामधून कसे काय सुटले की त्यातून काही राजकीय फायदा नाही म्हणून त्याविषयी भाष्य केले नाही हे कळायला मार्ग नाही.
शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी म्हणायला तुमचा विरोध आहे हे समजू शकतो पण काही धर्मांध संघटना अलीकडे त्यांच्या हातात कुराण देऊन त्यांना इस्लामप्रेमी ठरवू पाहत आहेत ही गोष्ट आपल्यासारख्या पुरोगामी नेतृत्वाला माहीत नाही असे होणार नाही तरी तुम्ही त्यावर काही बोलला नाही याचे ही आश्चर्य वाटते.
आता साहेबांनी या गोष्टींचा विचार करून सक्रीय राजकारणातुन निवृत्ती घेऊन पूर्णवेळ इतिहासाच्या अभ्यासाला द्यावा म्हणजे आजवर जसे राजकारणात राहून शेतकऱ्यांचे भले केले तसे आता तुमच्या अभ्यासामुळे इतिहास संशोधकांचा देखील फायदा होईल.
Leave a Reply