नवीन लेखन...

शिक्षा पद्धती – एक दृष्टीक्षेप

आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील?

मानवी स्वभाव वर्तन प्रत्येकाचे अलग, वेगळे असते. त्यामुळे एखाद्या अपराध्याला दिलेली वागणूक दुसऱ्याला सोयीची, लागू पडेलच हे सांगता येत नाही. आजकाल तुरुंग म्हणजे डांबून ठेवण्याची केंद्रे राहिली नसून (Custodial) सुधारण्याची केंद्रे झाली आहेत. प्रथम गुन्हेगारांना शिक्षा न करता सौम्य शिक्षा/सुधारणा होईल अशी वागणूक देणे महत्वाचे आहे. त्यांच्या अपराधाप्रमाणे वर्गीकरण करणे जरूर आहे. सुधारित राष्ट्रांमध्ये आता शिक्षाशास्त्रात बरीच प्रगती झाली आहे. शिक्षा न देता तो गुन्हेगार कसा सुधारेल आणि इतर व्यक्तीप्रमाणे समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा स्थिर होईल हे पाहणे फार महत्वाचे आहे. अशी आशा करण्यास हरकत नाही की, ‘सुधारित शिक्षाशास्त्र कल्याणकारक होईल.’

जगातील सर्वच देशांचे गुन्हेगारांना शिक्षा करणे हे प्रमुख कर्तव्य असते. समाजात वाईट कृत्ये घडतच राहणार आणि त्यांचेवर नियंत्रण ठेवून समाज सुधारणे हे अव्यहत चक्र चालूच आहे. गेल्या 200 वर्षांपासून या बाबतीत अभ्यास होत आहे.कारण समाजाच्या कल्पना बदलत आहेत. सामाजिक मूल्ये बदलत आहेत. अलीकडे समाजामध्ये मंथन होत आहे की, गुन्हेगारास नाहीसे करायचे की त्याला एखादा रुग्ण, आजारी समजून औषधाप्रमाणे उपाययोजना करायची की, एखादे लहान मूल समजून त्याला कडक शिस्त लावणे जरूरीचे आहे? का सरळ कडक शिक्षा देऊन इतरांना धडा शिकवायचे की, अपराध करणे चांगले नसते. सर्व जगाला हा प्रश्न भेडसावित आहे की, गुन्हेगार, अपराध आणि शिक्षा यांची संगती कशी लावायची आणि त्यामधून काय साध्य करायचे? तत्त्वज्ञ श्रीयुत् सामंड म्हणतात की,’अपराध (crime) म्हणजे कायद्याने मान्य केलेले घोकादायक कृत्य होय. अपराधी हे त्याचे भक्ष्य ठरते. एकाने खून केला तर दुसऱ्याचा जीव जातो पण त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते. भरपाई मिळत नाही. कायमचे नुकसान होते. सरकारतर्फे आरोपीला शिक्षा होते. फाशी अगर जन्मठेप आणि दंड शिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अपराधाच्या स्वरूपानुसार शिक्षा दिल्या जातात.’

— अॅड. प. रा. चांदे
नाशिक ४२२००९

— “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..