सौख्य, समृद्धीच्या पंखाखाली
जरी निश्चिंती, मी सदैव जगलो…
तरीही अव्यक्त हुरहुर अनामिक
स्मरणगंध सारे उसवित राहिलो…
उसवीणे ते, आनंदी आत्मरंगले
धागे सारे शब्दात गुंफित राहिलो…
प्रीतभावनांचे पदर ते दवभरलेले
गीतात, नित्य आळवित राहिलो…
तरीही अजुनही हुरहुर अनामिक
आत्मारामा अंतरी शोधित राहिलो…
हुरहुर जरी ती, तरीही शांती सुंदर
मनास माझ्या समजावित राहिलो…
साक्षी, उभी अंगणी प्रसन्न बकुळी
तीलाच स्मरत मी गंधाळत राहिलो…
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८५
२/८/२०२२
Leave a Reply