सराईत गुन्हेगारानाही टेलिफोन ही एक पर्वणीच आहे. प्रत्यक्ष न भेटता गुन्हेगारी करता येते. लोकाना धमकावता येते. खंडणी वसूल करता येते. पोलिसांकडे नसेल इतकी अत्याधुनिक टेलिफोन यंत्रणा या गुन्हेगारांकडे आहे. त्यावर कॉन्फरन्स सेवेपासून रिमोट कंट्रोलपर्यंत सर्वच सोय आहे.
रमेश आहे का?
नाही.
कुठे गेलाय?
कॉलेजात.
मी त्याचा मित्र बोलतोय, प्रवीण.
काही निरोप?
काही नाही.
वरील संभाषणात तस आक्षेपार्ह वाटाव असे काही नाही. फक्त फरक एवढाच, की प्रविण म्हणून जो बोलत होता त्याने दहा ठिकाणी असेच फोन फिरवून रमेश आहे का, हो प्रश्न विचारलेला होता. रमेश नाव इतक लवचिक, की ते कुठेही सापडत.
तासाभराने त्याने तोच नंबर परत फिरवला.
मी प्रवीण बालतोय.
बोल, भेटला का रमेश?
नाही , त्याला सिरीयस ऍक्सिडंट झालाय. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केलय.
पुढे अधिक काही बोलायच्या आत टेलिफोन कट झाला. रमेशच्या घरी हाहाकार, सर्वच हॉस्पिटलकडे धावले. त्याचे मित्रही. अर्धा तास शोध घेतला, सापडला नाही. मगे शेजारची इतर हॉस्पिटल्स, पोलिस स्टेशन, पाच-सहा तास यातच गेले, यातायात. तेवढया वेळात रमेश कॉलेज संपूवन घरी जाऊन पोचलेला.
प्रवीण म्हणून बोलणारा मजेत टीव्ही पाहात बसलेला. टाईमपास म्हणून फोन केलेला.
८४५३२६७?
नाही. राँग नंबर.
कोणता नंबर आहे?
८४५३२७७
नायर साहेब आहत?
नायर नाही, इथे वकील राहतात आणि ते आता घरी नाहीत. दौऱ्यावर गेले आहेत. पंधरा दिवसानी येतील.
पंधरा दिवसांच्या आत वकिलाच्या घरी चोरी होते.
डॉक्टरांना रोज रात्री घाम फुटतो. साडेअकरानंतर त्यांच्या घराची शांतता भंग पावते. टेलिफोन खणाणतो. कोण डॉक्टरसाहेब? किती पेशंट तपासलेत? उद्या मरायला तयार राहा. महिनाभर असा विचित्र फोन येतोय. पोलिसांकडे तक्रार करुन झाली. टेलिफोनकडे तक्रार करुन झाली. पण काही उपयोग नाही. फोन करणारा रोज रात्री वेगवेगळया फोनवरुन फोन करतो.
मुंबईत ११ लाख टेलिफोन आहेत. देशात सर्वात जास्त आणखी लाखो लोक प्रतीक्षेत आहेत. पाच हजार एसटीडी, आयएसडी टेलिफोन बुथ आहेत. मुंबईत टेलिफोन ही काही प्रतिष्ठेची किंवा चैनीची गोष्ट नाही. अत्यावश्यकच आहे, कोण कुठे केव्हा अडकून पडेल आणि टेलिफोनवर संपर्क साधावा लागेल याचा नेम नाही. पण जेवढी सोय तेवढीच गैरसोय.
दिवसातून किती राँग नंबर येतील सांगता येत नाही. महिन्यातून किती दिवस टेलिफोन बंद पडेल माहिती नाही. चालला तर नशीब. काही वेळा फक्त बाहेरुनच फोन येतात, तर बऱ्याच वेळा फक्त फोनच करता येतो. त्यात आता अनामिक फोनची भर पडली आहे. कामधंदा नसलेले पण हाताशी टेलिफोन असलेले आणि विकृत मनोवृत्तीचे बरेच लोक शहरात विखुरलेले असावेत.
ही मंडळी रात्री-बेरात्री केव्हाही कोणताही नंबर फिरवतात, लोकाना उठवतात, वेडेवाकडे निरोप सांगतात. आवाज हळुवार वाटला तर वाटेल ते बोलतात. या मनोविकृत अनामिक लोकांच काय करायच. हा प्रश्न एमटीएनएल आणि पोलिसांना पडला आहे.
त्याबरोबरच सराईत गुन्हेगारानाही टेलिफोन ही एक पर्वणीच आहे. प्रत्यक्ष न भेटता गुन्हेगारी करता येते. लोकाना धमकावता येते. खंडणी वसूल करता येते. पोलिसांकडे नसेल इतकी अत्याधुनिक टेलिफोन यंत्रणा या गुन्हेगारांकडे आहे. त्यावर कॉन्फरन्स सेवेपासून रिमोट कंट्रोलपर्यंत सर्वच सोय आहे. मोठे गुन्हेगार तर वॉकी-टॉकी बाळगून असतात. पण त्याचा पत्ता लागत नाही. मनोविृत अनामिकांपेक्षा हे गुन्हेगार जास्त तापदायक असतात. शोधणही कठीण असत.
हे तापदायक टेलिफोन कुठून येतात, हे शोधण फारच अवघड असत. पण इलेक्ट्रॉनिक्स एक्सजेंजमुळे टेलिफोन निगमन एक खास विभाग काढलाय. कारण रोजच वाढत जाणाऱ्या तक्रारी. ज्यांना असे टेलिफोन निगमचे अधिकारी हे अनामिक टेलिफोन कुठून येतात ते शोधून काढू शकतात.
अशा त-हेचे अनामिक कॉल वाढण हे शहराच्या दृष्टीने काही फारस निरोगी लक्षण नाही.
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक ८ डिसेंबर १९९४
Leave a Reply