आनंदाने नाचत गात,
घेत हृदयाचे ठाव ,
चाललो मी पुढे पुढे ,
झरा माझे नाव,–!!!
कपारीत डोंगराच्या,
जन्म होई माझा,
झुळझुळ वाहत जाता,
होत असे मी मोठा,–!!
शांत निर्मळ पाणी,
हळूहळू पुढे जातसे ,
पारदर्शक थेंब लोलक,
नजरेत ना भरती कसे,–!!
असे धवल थेंब धावती,
त्यांची बनते सुरेख नक्षी,
ती बघण्यास उत्सुक हा,
सारखे येती माझ्यापाशी,–!!
अशांत, अस्वस्थ चित्ता,
क्षणार्धात करतो शांत ,
मनस्ताप होता क्षणी,
धावती इथे निवांत,–!!
अवतीभोवती वृक्षराजी,
अन पक्ष्यांचे मंजुळ कूजन,
माझ्या पाण्याची धून मंजुळ,
हा पक्षीगान ते मधुर,-?-!!
मंद वारा संगतीला,
अखंड नित्य वाहे,
जो येईल तो आजूबाजूस,
निसर्गचित्रच पाहे,—!!!
तहान भागवण्या येती,
लहानथोर कित्येक पक्षी,
गोड पाण्याने तृप्त होतां
रमती बघा माझ्या वक्षी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply