हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही. काही वेळा १४ वर्षे व्रत करून उद्यापन करतात. काही ठिकाणी कुळांत कुलाचार म्हणून सुरु राहते. या व्रतात अनंत ही प्रमुख देवता असून शेष व यमुना या गौण देवता आहेत.
पांडवांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात राहावे लागले. त्यावेळी श्रीकृष्णाने पांडवांची आपत्तीतून मुक्तता होण्यासाठी युधिष्ठिराला हे व्रत सांगितले.
Leave a Reply