नवीन लेखन...

अनर्थातला अर्थ

प्रतीयमानं पुनरन्यदेव वस्त्वस्ति वाणीषु महाकवीनाम /
यत्तत्प्रसिध्दावयातिरिक्तं विभाति लावण्यामिवांगनासु //

या संस्कृत श्लोकाचा अर्थ सौभाग्यवती सन्नी लिऑन यांना विचारला गेला तेव्हा,त्यांना ही भाषा मंगळावरची की बुधग्रहावरची हा प्रश्न पडला.या प्रश्नात त्यांना एक उत्तर दिसलं,ते असं की परग्रहावर कुणीतरी नक्किच असायला हवं. म्हणजे,देअर इज ऍ़न ऍ़र्पाच्युनिटी टू  लेड फौंडेशन ऑफ पॉर्न इंडस्ट्री.त्या उत्स्फुर्तपणे उद्गारल्या.

यू ऑर ग्रेट,सौ.सन्नीचे मिस्टर त्यांची पाठ थोपटत म्हणाले. तुम्हास संधी कुठेही सापडू शकते हा शोध लागून आमचे ह्रदय भरुन आले आहे.
संधीचं असच असतं यारा,कोलंबस शोधायला गेला इंडिया पण त्यास मिळाली अमेरिका.ही  अमेरिका त्यास मोठी संधी वाटली.त्या संधीचं इतरांनी सोनं केलं.मी सुध्दा अमेरिकेत आले.

म्हणून तू सन्नी झालीस. पतिराज बोलले. यारा स से सोनं आणि स से सन्नी..
हौऊ ब्युटिफूल.तुला कसं रे सुचतं,इतकं छान छान..

मी तुझाच यारा ना ! तुला त्या परग्रहावरच्या भाषेत जर पॉर्न इंडन्स्ट्रीची संधी दिसू शकते.तर मला स से सन्नी कां सुचू शकत नाही.
पण यारा ,हा जो श्लोक आहे,तो कशासाठी परग्रहावरुन इकडे आला असेल,आपण अँजिनिलाला विचारु या का?
नको,ती आपल्याला ओळखत नाही.

राखी सावंतलाच विचारलं तर..

त्यांचा पत्ता आपणास कुठे ठाऊक.शिवाय त्यांनी अर्थाचा अनर्थ करुन सांगितला तर पुन्हा पंचाईत.त्या तिखट नाहीत का जराशा.
ते ही खरच म्हणा,त्यांना कळलं की परग्रहावर माणसं राहतात तर त्या तिथं बिग बॉस सुरु करण्यासाठी सलमानभाईच्या पाठिमागे लागतील. तशा त्या फार हुषार. त्यांच्याकडे बिझिनेस माईंड असल्याचं शोभाताई डे यांनी एकदा म्हंटल होतं.

मग मार गोली तिला,आपण आपलं बघावं.हिला विचार,तिला विचार कशाला.प्रियंका चोप्रा काय शिल्पा शेट्टीस विचारत बसली का प्रेमात पडण्यासाठी? शिल्पाच्या बाजुने वेळ होता तेव्हा ती प्रेमारली.प्रियंकाने वेळ साधली आणि ती अक्षय बहरली.
तुला कसं ठाऊक सारं.

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये प्रेमाच्या कथा अशाच लिहिल्या जातात.जेनिफर ब्रॅड पिटवर फिदा होती. ब्रॅड पिट अँजेनिलावर प्रेम करयाचा.अँजेलिना चार जणांवर प्रेमाचा वर्षाव करायची. ब्रॅडने जेनिफरला सोडले.अँजेलिनाचा प्रेम पाऊस आटला.जेनिफर,जस्टिन थेरॉक्समध्ये गुंतली.ब्रॅड,अँजिलिनास आय लव्ह यू म्हणाला.अँज्येलिनाने त्याला त्याच्या घरातून बाहेर काढले.आपलंही घर सोडलं.तिसऱ्याच घरी रहायलं गेले.वगैरे. जेनिफरच्या आधिची ब्रॅडची प्रेयसी ग्वालथेन प्लॉट्रो एकमेंकाना कॉफी पिण्यासाठी भेटल्या.ती तिच्या नव्या प्रेमकथेत गुंतलेली आणि ही हिच्या चौथ्या प्रेमकथेत.

याचा अर्थ प्रेमा तुझा रंग कसा असं या दोघी तिकडे आणि प्रियंका टू कॅटरिना टू दीपिका इकडे यावर चिंतन करतात नाही का रे.
मग या श्लोकाचा अर्थ आपणास कोण बरं सांगणार.कारण महाराष्ट्रप्रांती सध्या दूरान्वयेही एकही महामहोपाध्याय वगैरे दृष्टिक्षेपात येत नाही.
आपण मिसेस निरजा राडियाला याचा शोध घ्यायला ऍम्लॉय करु या का?

सखे,काय पण तुझं डोकं चालतं गं.या राडियाताई ग्रेट कनेक्टर आहेत.त्या कुठे ना कुठे या श्लोकाचं कनेक्शन नक्किच जोडून देतील. कसं गं सुचतं तुला हे.ब्रेन वुईथ ब्युटी म्हणतात ना, ते हेच.ते केवळ ऐश्वर्या रॉय यांच्याकडेच नसून तुझ्याकडेही आहे,हे बघून माझे ह्रदय भरुन आलेय., पतिराज सन्नीचं कौतुक करत असतानाच,आकाशवाणी झाली.

मित्रा,कशाला जातोस कुठे विचारायला,राडिया ताईला.तू जे काही बोललास ना तुझ्या याराला तोच या श्लोकाचा अर्थ.
म्हणजे ? सन्नी आणि त्यांच्या पतिराजांनी आकाशाकडे चमकून बघितलं,
म्हणजे असं की दोस्ता, एखाद्या स्त्रिचं खरं सौंदर्य हे तिची गात्रं किंवा अवयवांपासून वेगळं असतं की रे..

म्हणजे मी बाहेरची वेगळी आणि मी आतली वेगळी असं काही म्हणायचय का तुम्हास.
तसचं काहीसं.

अरे देवा,इट मिन्स तो श्लोक मंगळावरचा किंवा बुधावरच्या मनुष्यप्राण्यांचा नव्हता तर..
यात एवढं,अरे देवा असं म्हणण्यासारख काय झालं.
काय झालं म्हणजे,इट मिन्स नो ऍ़पॉर्च्युनिटी टू लाँच पॉर्न इंडस्ट्री ऍ़ट मंगळ ना..

सन्नीचं हे बोल ऐकून आकाशवाणी करणाऱ्याने कप्पाळावर हात मारुन घेतला.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..