आंधळी गोफन…!
घेऊन पोटी गारगोटी,
फिरे आंधळी गोफनं,
कोणा हेरे गारगोटी,
काय कोणालं मालुम…!
गारी गारीवर लिहलेलं,
तिच्या सावजाच नांव,
गर गर घुमे आसमंती,
घेया सावजाचा ठाव….!
फीरे आंधळी गोफन,
तिचा ठाव सायंऽ सायंऽ,
कोण कुठे ते पारध,
ना ही कुणा ठाव काय….!
ती तं आंधळी गोफन,
तिचा आंधळाच नेम,
येई जो ही सपाट्यात,
आंधळ्या आयुधाचा गेम…..!
© गोडाती बबनराव काळे,लातुर.
9405807079
Leave a Reply