माझे ‘हे आम्ही का करायचे ?’ हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.
अंगाला भस्म का लावायचे?
गुरुचरित्रात भस्म या विषयी एक अध्याय आहे. म्हणून मी स्वतः अंघोळ झाल्यावर भस्म लावून पाहिले. तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की, भस्म लावले की थंडीच्या दिवसात थंडी वाजत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात घाम कमी येतो व घामोळे होत नाही.
भस्म म्हणजे गाणगापूरच्या भस्माच्या डोंगरावरील भस्म नव्हे. उदबत्तीची राख , गाईच्या गोवऱ्या जाळून होणारी राख हे भस्म. भस्म हे उरलेली राख असते त्यामुळे ते निर्जंतुक नक्की असते. शिवाय गाईच्या शेणापासून केलेले भस्म रेडिएशन वेव्ह्ज पासून संरक्षण करते.
कपाळाला -आज्ञाचक्राला हे भस्म लावण्याची प्रथा दक्षिण भारतात आहे . हल्ली उन्हाळ्यात पावडरच्या जाहिराती येतात. त्या पावडरी पांढऱ्या दगडाची पावडर असते. त्यापेक्षा भस्म केव्हाही स्वस्त व उत्तम.
थोडे भस्म (चिमूटभर) हातावर घ्यावे, त्यात थोडे पाणी कालवावे व सर्व अंगाला लावावे. त्यात मांड्या , पोटऱ्या, दंड, छाती, मान, खांदे, कपाळ, कान या महत्वाच्या अवयवांना लावल्यास थंडी वाजत नाही.
— अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
Leave a Reply