इंडस्ट्रीमध्ये अभिनय, डायलॉग आणि सतरंगी डान्सने ओळख निर्माण करणारा अभिनेता अनिल कपूर यांचा जन्म २४ डिसेंबर १९५९ रोजी मुंबई येथे झाला.
अनिल कपूर प्रसिद्ध फिल्म निर्माता सुरेन्द्र कपूर यांचे सुपुत्र. अनिल कपूरचं नाव घेतलं की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस याचं गणित अचूक जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अजूनही मुंबईतल्या गल्लीबोळात लहानाचा मोठा झालेल्या तरुणांचा टपोरीपणा अजूनही कायम आहे. ‘वेलकम बॅक’सारख्या चित्रपटात नानाबरोबर पुन्हा एकदा जमवलेली अभिनयाची भट्टी असेल नाहीतर त्यांच्या ‘२४’ या बहुचर्चित शोच्या दुसऱ्या पर्वात त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही ‘जबरदस्त’ असते. १९७९ मध्ये ‘हमारे तुम्हारे’ सिनेमातून पदार्पण करणारे अनिल कपूर यांचा प्रवास आज सुध्दा त्याच गतीने पुढे गेलाय आजसुध्दा रुपेरी पडद्यावर आपल्या फिटनेस आणि स्मार्टनेस अनेक नायकांना त्यांनी मागे टाकले.
८० च्या दशकात अनिल यांनी अनेक सिनेमांच ‘झकास’ डायलॉग म्हटला आहे, जो त्यांची ओळख झाली होती. ते आजच्या अभिनेत्रींच्या अपोझिटसुध्दा परफेक्ट दिसतात. बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच त्यांची दुसरी ओळख निर्माता आहे. अनिल यांचा ‘मशाल’, ‘तेजाब’, ‘बेटा’, ‘वो सात दिन’, ‘लम्हे’, ‘मेरी जंग’, ‘जांबाज’, ‘कर्मा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘विरासत’सह अनेक सिनेमे असे आहेत ज्यांची आजही प्रशंसा होते. ‘कांटे नही कटती ये दिन ये रात’ हे ‘मिस्टर इंडिया’या सिनेमातील अनिल कपूर आणि श्रीदेवीवर चित्रीत केलेलं गाणं आजही हॉट गाण्यांच्या यादीत लिहिलं जातं. या गाण्यात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची जबरदस्त हॉट केमिस्ट्री बघायला मिळाली.
अनिल कपूर यांनी नंतर टॉलीवुड मध्ये अभिनय करण्याचा प्रयत्न केला. तेलुगू फिल्म ‘वम्सावृक्षं’ व मणिरत्नम यांची पहिली कन्नड़ फिल्म ‘पल्लवी अनुपल्लवी’ मध्ये काम केले. यश चोपड़ा यांच्या ‘मशाल’ या चित्रपटात उत्तम अभिनय केला. ‘मेरी जंग’ या सारख्या फिल्म मध्ये न्याया साठी लढणाऱ्या एक नाराज तरुण वकीलाची ची भूमिका करून एक परिपक्व अभिनेता म्हणून आपल्याला सिध्द केले. मा.अनिल कपूर यांनी रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरसुध्दा शानदार अभिनय केला आहे. पहिल्यांदा त्यांनी २०१० मध्ये ‘२४’ (अमेरिकन) टेलिव्हिजन सिरिजमध्ये काम केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी ‘२४’ (इंडियन) सिरिज बनवली. या मालिकेत त्यांनी जय सिंह राठोडची भूमिका साकारली होती.
‘२४’ सिरिजच्या मूळ शो बरोबरच ‘फॅमिली गाय’ आणि ‘प्रिझन ब्रेक’ अशा दोन अमेरिकन शोचेही हक्क त्यांनी विकत घेतले असून येत्या काळात ते टेलिव्हिजन येतील. अनिल कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर बॉलिवूडचे यशस्वी निर्मात्यांपैकी एक होते. त्यांनी ‘पुकार’, ‘नो एंट्री’, ‘जुदाई’, ‘हम पांच’, ‘वो सात दिन’सारखे सिनेमे निर्मित केले होते. १९८४ मध्ये त्यांनी सुनीता कपूर यांच्या बरोबर लग्न केले. अनिल कपूर यांचा थोरला भाऊ बोनी कपूरसध्दा यशस्वी निर्माता आहे. दुसरीकडे, बोनी यांची पत्नी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी आहे. अनिल कूपूर यांना तीन मुले. त्यांमध्ये दोन मुली सोनम आणि रिया, मुलगा हर्षवर्धन आहे. सोनम बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आणि रिया निर्माती आहे. तसेच मुलगा बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply