नवीन लेखन...

घोट्याचा सांधा

घोट्याचा सांधा हा आपल्या पायाजवळ जमिनीपासून २-३ इंच उंचीवर शरीराचे संपूर्ण वजन घेऊन हालचाल करणारा अतिशय महत्त्वाचा सांधा आहे.

हा सांधा एकूण तीन हाडांमध्ये तयार होतो. पोठरीतील दोन हाडे १) टिबीया २) फिब्युला आणि पायातील ३) टॅलस या हाडांनी मिळून हा सांधा तयार केला जातो. यात पोठरीतील जाडे व महत्त्वाचे हाड खालच्या बाजूस अधिक रुंद व पसरट झालेले असते व ते टॅलस या हाडाच्या डोक्यावर किंवा वरच्या भागावर (Head) बसविलेले असते. आपल्या शरीराचे सर्व वजन या टिबीयामधून टॅलस या हाडात पर्यायाने सर्व पावलात पाठविले जाते. पोठरीमधील फिब्युला या पातळ हाडाचेही घोट्याच्या सांध्याजवळ जाड्या गाठीसारख्या आकारात रुपांतर होते व ते टॅलस हाडाच्या बाहेरील बाजूस छोटासा सांधा तयार करते अशा रितीने या सांध्याला थोडासा भक्कमपणा येतो.

टिबीया व फिब्युला या दोन हाडांची पावलाजवळील टोकेही एक प्रकारच्या छोट्या सांध्याच्या प्रकारात बांधलेली असतात याला Tibiofibular Syndesmosis असे नाव आहे. घोट्याच्या सांध्यातही निरनिराळी कुशल हालचाल आपण सतत करीत असतो. त्यामुळे हा सांधाही दोन्ही बाजूंनी उभ्या अशा लिगामेंटनी बांधलेला असतो. याशिवाय पुढे व मागे आडव्या अशा दोन लिगामेंट असतात.

प्रत्येक खेळात पावलावर वजन टाकून आपण धावपळ करत असल्यामुळे हा सांधा खेळाडूच नेहमीच जखमी होतो.

यात पाय घसरणे, उलटासुलटा वळणे; तसेच पाय फिरून पडणे असे अनेक प्रकार रुग्णांना निरनिराळ्या प्रकारच्या घोट्याच्या सांध्याच्या इजा करून ठेवतात. आपल्या नेहमीच्या चालण्यात या सांध्याची हालचाल पूर्ण होत असेल तरच आपले चालणे सुलभ होते नाहीतर आपण लंगडत चालतोय असे इतरांना वाटते. त्यामुळे या सांध्यात कडकपणा (Stifiness) येऊन चालणार नाही… म्हणनच या सांध्याला झालेल्या इजावरील उपाय योग्य डॉक्टरांनीच कराव्या लागतात. याही सांध्यात वंगण तयार करणाऱ्या ग्रंथी असतात व त्याचे जंतुसंसर्ग किंवा संधीवातानेही हा सांधा सुजू शकतो.

खुब्याचा सांधा-गुडघा व घोट्याचा सांधा या तीन सांध्यांनी मिळून आपल्या शरीराला व्यवस्थित इकडून तिकडे नेण्याची जबाबदारी घेतलेली आहे. म्हणून या तीन सांध्यांच्या त्रिकुटाला Kinetic chain असे म्हणतात.

सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..