पाय मुरगळणे (Ankle sprain) या गोष्टीचा अनुभव प्रत्येकालाच असतो. ‘पाय मुरगळून मी पडलो’ ही अगदी नेहमी आढळणारी रुग्णाची तक्रार असते.
मोठ्या प्रमाणात पाय मुरगळला तर घोट्याच्या आजुबाजूची हाडेच तुटू शकतात व रुग्णाला उचलूनच हॉस्पिटलमध्ये आणावे लागते. पण थोड्या प्रमाणात पाय मुरगळला म्हणजे घोटा हा सांधा फिरला तर हाडाच्या ऐवजी घोट्याभोवती असलेल्या लिगामेंटना मार लागू शकतो. अशावेळी त्वरित जरी सूज आली नाही तरी हळूहळू घोटा सुजतो व रुग्ण लंगडू लागतो. पायावर वजन टाकून उभे राहाणे त्याला कठीण होऊ लागते व काही काळानंतर त्याला डॉक्टरकडे पोहोचावे लागते.
या छोट्या प्रमाणातल्या मुरगळण्यास Ankle sprain म्हणतात. लिगामेंट या अनेक धाग्यांनी बनलेल्या कापडासारख्या असतात आणि त्या टीबिया व फिब्युला या हाडांना पुढून व मागून आडव्या आकारात बांधून असतात. त्यामुळे प्रथम जखम त्यांना होते. यात लिगामेंटचे काही धागे फाटतात व तेथे रक्तस्राव होऊन सांधा सुजतो. जर ही लिगामेंट संपूर्ण तुटली तर रुग्णांना उभे राहणेही शक्य होत नाही. हे विशेषतः बाजूच्या उभ्या लिगामेंटच्या बाबतीत होते अशा रुग्णांना मात्र ३-४ आठवडे प्लॅस्टरमध्ये राहावे लागते. खेळण्याच्या मैदानावर असे बऱ्याच वेळा होते. सुरुवातीला बर्फाच्या शेकाने सूज येण्याचे लांबते.
त्यानंतर इलास्टिक बँडेजने घोटा गोलाकार बांधून ठेवावा. रुग्णाला झोपवून पाय उशीखाली उंच करून ठेवावा. एकदा का डॉक्टरने तपासले की, डॉक्टर क्ष-किरण तपासणी करून योग्य उपाययोजना करतात. हाड तुटले नसेल आणि फक्त लिगामेंटला कमी-जास्त भार असेल तर इलास्टिक बँडेज, गोळ्या व विश्रांतीनीही रुग्ण बरे होता. फार कमी रुग्णांना लिगामेट पूर्ण फाटली असेल तरच शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. छोट्याशा मुरगळण्यानेही अनेक रुग्णांना बरेच महिने तुटलेल्या लिगामेंटजवळ दुखत कुतूहल राहाते. कधीकधी cortisone इंजेक्शनही देतात. कधीकधी नवीन प्रकारचे घोट्याला धरून ठेवणारे खास बूटही काही काळ घातल्याने रुग्णाचा त्रास कमी होतो.
लिगामेंट पूर्ण तुटली आहे की नाही हे नवीन नवीन तपासण्यानंतर म्हणजे टफ्कस्कॅन वगैरे केल्याने कळते. तसेच घोट्याच्या सांध्याच्या आतही काही इजा झाली असेल तर ती कळू शकते. साध्या क्ष-किरण तपासणीत हे दिसत नाही म्हणून हल्ली डॉक्टर या महागड्या पण महत्त्वाच्या तपासणीकडे वळू लागले आहेत.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply