व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रशांत पोळ यांचा लेख
जगातल्या उपलब्ध असणाऱ्या सर्व साहित्यामध्ये, अन्नासंबंधी अथवा भोजनासंबंधीचे सर्वात प्राचीन असे उल्लेख आढळतात ते भारतीय ग्रंथांमध्ये. ऋग्वेद हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो. या ऋग्वेदामध्ये परिपूर्ण आहारासंबंधी अनेक सूक्त आहेत. वनस्पतींपासून सकस अन्नाची निर्मिती करण्याचे श्रेय भारताकडेच जाते. जगातल्या शेतीचा पहिला पुरावा हा आता पाकिस्तानचा भाग असलेल्या, पण पूर्वी अखंड हिंदुस्थानाचा एक हिस्सा असलेल्या बलुचिस्तानमध्ये मिळालेला आहे.
जगाला वेड लावणारा डोसा किंवा मसाला डोसा (दोसा) हा पदार्थ किती जुना आहे..? निश्चित सांगता यायचं नाही. पण सुमारे दोन हजार वर्षे तरी नक्कीच..! म्हणजे इतिहासाच्या ज्ञात साधनांचा, कागदपत्रांचा धांडोळा घेत मागे गेलो की कळतं, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीही अत्यंत चविष्ट असा हा डोसा दक्षिण भारतात खाल्ल्या जात होता.
हे फार महत्त्वाचं आहे. भारतीय संस्कृतीच्या संपन्नतेमध्ये फक्त वास्तूनिर्माण शास्त्रच नव्हतं, कला आणि नाट्यक्षेत्रच नव्हतं, फक्त विज्ञान नव्हतं, फक्त अध्यात्म नव्हतं तर संपन्न अशी खाद्यसंस्कृतीही होती. अर्थात जीवनाच्या सर्व अंगांची परिपूर्णता होती.
खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत आपल्या पूर्वजांनी खूप बारीक विचार करून ठेवलाय. आजचे आहारशास्त्र ज्या गोष्टींना ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न करते, त्या सर्व गोष्टी भारतीय आहारशास्त्राने काही हजार वर्षांपूर्वीच मांडलेल्या आहेत. ‘आहाराचा आणि शरीराचा, आहाराचा आणि मनाचा, आहाराचा आणि चित्त वृत्तीचा संबंध असतो’ हे आपल्या पूर्वजांनी काही हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. हे अद्भुत आहे. त्या काळात प्रगत असलेल्या ग्रीक, इजिप्शियन किंवा चीनी संस्कृतीत असा उल्लेख दुरान्वयानंही आढळत नाही. दुर्दैवानं आपल्या ह्या प्रगत आणि परिपूर्ण आहार प्रणालीची आपल्याला जाणीवच नाही.
‘भगवद्गीता’ हा ग्रंथ किमान साडेपाच ते सहा हजार वर्षे प्राचीन असावा असा अंदाज आहे. अगदी पाश्चात्त्य विद्वानांच्या हवाल्यावरून बघितलं तरी ‘गीता’ ही किमान अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी लिहिली गेली आहे हे निश्चित. या गीतेतल्या १७ व्या अध्यायात ८, ९ आणि १० हे तीन श्लोक आहेत, जे आहाराचा आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल भाष्य करतात. सात्त्विक, राजसी आणि तामसी असे तीन प्रकारचे स्वभाव असलेल्या व्यक्तींमध्ये शरीर पोषण करण्यासाठी तीन प्रकारचे आहार घेण्याची प्रवृत्ती दिसून येते आणि या तीन मानसिक वृत्तींना अनुसरून त्यांची कर्मेदेखील तीन प्रकारची असतात असे दिसून येते… !
वानगीदाखल आठवा श्लोक बघूया
आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः रस्याः ।
स्निग्धाः स्थिरा: हृद्या: आहारा: सात्त्विकप्रियाः ।।
आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख आणि प्रसन्नता यांची वृद्धी करणारे, रसयुक्त, स्निग्ध, बराच काळ राहणारे आणि मनाला प्रिय वाटणारे असे आहार, सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतात.
एक परिपूर्ण, वैज्ञानिक आणि प्राचीन खाद्यसंस्कृती असलेला आपला देश हा जगाच्या पाठीवर एकमात्र आहे. अगदी ऋग्वेदापासूनच्या ग्रंथांमध्ये आहारशास्त्राचे उल्लेख सापडतात. ‘यजस्वम तत्रं त्वस्वाम..’ (आपल्या शरीराचे पोषण करून त्याचा सत्कार करा) असे उल्लेख अनेक ठिकाणी आहेत. भोजनात गहू, जव, दूध यांचा समावेश असावा असंही वर्णन येतं. अथर्ववेदाच्या सहाव्या अध्यायातील १४०/२ या सूक्तात म्हटलंय, ‘तांदूळ, जव, उडीद आणि तिळापासून बनवलेले पदार्थ हा योग्य आहार आहे.
ह्या लिहिलेल्या ग्रंथांना समर्थन देणारे अनेक पुरावे मेहेरगढ, हडप्पा आणि मोहन-जो-दारोच्या उत्खननात सापडले आहेत. त्यानुसार सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आपले पूर्वज गहू, जव, दूध इत्यादींनी बनलेल्या वस्तू खात होते हे निश्चित. विशेष म्हणजे भोजनात मसाले वापरण्याचेही पुरावे उत्खननात मिळाले आहेत. दालचिनी, काळीमिरी यांचा उपयोग भारतीय भोजनामध्ये काही हजार वर्षांपासून होतोय.
प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे, मेहेरगढ हे आजच्या पाकिस्तानातील, बलुचिस्तानमधील लहानसे गाव. १९७४ साली तेथे सर्वप्रथम ‘जीन – फ्रान्कोइस जरीगे’ ह्या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याने उत्खनन सुरू केले आणि त्याला इसवी सनाच्या सात हजार वर्षांपूर्वीच्या गावाचे अवशेष मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, ह्या उत्खननात जगातील सर्वात प्राचीन असे शेती करण्याचे भरभक्कम पुरावे मिळाले. अर्थात आज तरी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे असे ठामपणे म्हणता येते की, जगात ‘शेती’ ही संकल्पना सर्वप्रथम भारतीय उपमहाद्वीपात सुरू झाली.
वेगवेगळ्या डाळी (मसूर, तूर वगैरे) उगवणं, गहू पिकवणं, त्या गव्हावर प्रक्रिया करून ( अर्थात गव्हाला दळून) त्याच्यापासून कणिक तयार करणं आणि त्या कणकेचे वेगवेगळे पदार्थ बनविणं…. हे सारं आठ-नऊ हजार वर्षांआधीपासून होत आलंय.
जागतिक खाद्यसंस्कृतीत भारताचं सर्वात मोठं योगदान कोणतं..? तर ते मसाल्यांचं..! आजपासून
-प्रशांत पोळ
Leave a Reply