नवीन लेखन...

अन्न हे पूर्ण ब्रह्म

आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती….. जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता.
गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचा.

अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला, पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.आज त्याचेच लग्न होते. तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले.

दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते.आम्ही तिथे पोचलो. तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती. हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले, दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती …..

मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला आणि शेजारच्याला खूण केली. ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला. मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो …..
त्यांच्या आदरातिथ्य्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला “काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते.
पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो …….

“अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली…..

कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला…. हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो…..

तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले “आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल ”
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले…….
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता……..

माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
“सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
” हि तुमची डिश आहे ना ??
” होय, मी परत उत्तरलो .
” हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल ”

मी चकित झालो .थोडा राग हि आला. त्याच रागात बोललो
“आहो थोडे राहिले अन्न ?
काय हरकत आहे .
नाही अंदाज आला.
म्हणून काय घरी न्यायचं” ??

“रागावू नका” तो गोड हसत म्हणाला.
हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
होय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा …..

म्हणून आम्ही हि शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता”…..

का ???

कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
” आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही.
हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा .” मला काही सुचेना काय बोलावे. थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकतायत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय……

इतक्यात सौ .म्हणाली “बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो …….

(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता..एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच….पण भुभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही…)

मग एक तर ती भिकारी भोजन पद्धत बंद करून पाने वाढा अन्यथा अन्नावाचून, अन्न पिकवणारा आत्महत्या करतोय…….खाऊन माजावे, टाकून नाही……


— संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्‍याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या  कॉमेंटमध्ये देऊ शकता.

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..