युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. तिची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ मध्ये करण्यात आली.
ही संस्था प्रामुख्याने शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतींमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते.
युनेस्कोचे मुख्यालय पॅरिसमध्ये असून जगभरात ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देणारी संस्था म्हणून ती जगाला परिचयाची आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक शाखा म्हणून ओळख असलेल्या युनेस्कोच्या महासंचालक पदी फ्रान्सच्या माजी सांस्कृतिक मंत्री ऑड्री आझूले या काम करत आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply