MENU
नवीन लेखन...

अँटी व्हायरस सॉफ्टवेअर

जिथे प्रश्न आहे तिथे त्याचे उत्तरही उपलब्ध असतेच. संगणकात विषाणूंचा शिरकाव होऊ लागला व संगणक प्रणाली बंद पडू लागल्या तेव्हा हा प्रकार नेमका कशामुळे होतो याचा शोध घेतला गेला.

पूर्वी तर सीडी हा प्रकार नव्हता, इंटरनेटचाही बोलबाला नव्हता; त्या वेळी फ्लॉपी डिस्कमधून हे विषाणू तुमच्या संगणकात यायचे. नंतर सीडीतून यायला लागले. आता तर इंटरनेटमुळे कुठलाही विषाणू केव्हा तुमच्या संगणकात येईल सांगता येत नाही.

हे विषाणू म्हणजे कुहेतूने लिहिलेले प्रोग्राम असतात व त्यांची पुनरावृत्ती होते. संगणक विषाणूंचे ऑलिगोमॉरफिक, पॉलीमॉर्फिक व मेटॅमॉर्फिक असे त्यांच्या घातक गुणधर्मांच्या चढत्या क्रमाने प्रकार सांगता येतात. विषाणू ओळखण्यासाठी सॉफ्टवेअर शोधून काढण्याची कल्पना नंतर पुढे आली. १९८० पर्यंत या विषाणूंची डोकेदुखी कमी होती. कारण त्या वेळी इंटरनेटचा एवढा प्रसार झालेला नव्हता.

१९८७ मध्ये ब्रेन्ड फिक्स यांनी पहिल्यांदा संगणकात घुसलेला विषाणू बाहेर काढून टाकण्यात यश मिळवले. त्यानंतर संगणक विषाणूवर शोधनिबंध प्रकाशित करणारे फ्रेड कोहेन यांनी संगणक विषाणूंना पायबंद घालण्यासाठी १९८८ मध्ये काम सुरू केले.

जॉन मॅकफी व युजीन कास्परस्की यांनी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्याच स्थापन केल्या. नंतरच्या काळात इंटरनेटचा प्रसार झाल्याने सुमारे तेराशेपेक्षाही अधिक विषाणू हे संचार करू लागले. नॉर्टन, मॅकफी यांसारख्या कंपन्यांनी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तयार केली, पण त्यांच्या किमती जास्त आहेत. या सॉफ्टवेअरची सीडी विकत घेऊन ती संगणकात लोड केली की, संगणकाला विषाणूंपासून बऱ्याच अंशी सुरक्षा मिळते. विषाणू हार्डडिस्कमध्ये घुसून गोंधळ घालू शकतात. त्यामुळे काही वेळा थोडे पैसे गेले तरी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर घेणे क्रमप्राप्त ठरते.

इंटरनेट सिक्युरिटी म्हणजे इंटरनेटमधून येणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण मिळणे गरजेचे असते. त्याचबरोबर कुठलीही सीडी तुम्ही आणून कॉपी करता तेव्हा ती या सॉफ्टवेअरमुळे तपासली जाते. विषाणू सापडला तर ती फाइल बाजूला टाकली जाते किंवा फाइल नष्ट केली जाते. नवीन विषाणू या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरलाही दाद देतात असे नाही.

हे सॉफ्टवेअर तीन पद्धतीने काम करते. एक म्हणजे त्यात व्हायरस डिक्शनरी असते. निदर्शनास आलेला विषाणू त्याच्याशी ताडून पाहिला जातो. संगणक प्रोग्राममध्ये संशयास्पद वर्तन असेल तर त्याच्या आधारे हा धोका ओळखता येतो. तिसरी पद्धत म्हणजे सँडबॉक्स ही होय. पॉलिमॉर्फिक विषाणू हे सिग्नेचर पद्धतीलाही दाद देत नाहीत. त्यामुळे अनेकदा प्रगत पद्धती अवलंबल्या जातात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..