नवीन लेखन...

अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)

मध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसगडच्या वायव्येला मध्य प्रदेश, उत्तरेला उत्तर प्रदेश, ईशान्येला झारखंड, नैऋत्येला महाराष्ट्र, दक्षिणेला तेलंगणा आणि आंध्रप्रदेशआणि दक्षिण पृर्वेला ओडिशा राज्यांच्या सीमा आहेत.

छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता.

खनिज समृद्ध असे हे  राज्य आहे. भारतातील वीज आणि स्टील निर्मितेचे प्रमुख राज्य आहे. छत्तीसगड राज्यात भारतातील १५% स्टील ची निर्मिती होते. २०२० च्या जनगणनेनुसार ३२.२ दशलक्ष लोकसंख्या असलेले, १३५१९२ चौ. की.मी. क्षेत्रफळ असलेले भारतातील  लोकसंख्येचा दृष्टीने नवव्या क्रमांकाचे छत्तीसगड हे राज्य  आहे. भारतातील सर्वात वेगवान विकसीत होणारे राज्य म्हणून ओळखले जाते. भारतातील एकूण वनक्षेत्रा पैकी १३ टक्के एकटया छत्तीसगड राज्यात मोडते. ह्या राज्यातील अबुजमाड डोंगरात, घनदाट जंगले आहेत. ह्या जंगलांचे व्यवस्थित मोजमाप झालेले नाही असा ४५०० चौ की.मी. चा भाग सुद्धा आहे. हा जंगलांनी समृद्ध असलेला प्रदेश नक्षलवादी कारवायां साठी ओळखला जातो. नक्षलवादी कारवायांनी राज्याच्या प्रगतीसखीळ बसत असली तरी,नेत्रदीपक विकसित असलेले हे राज्य पर्यटकांसाठी नंदनवन आहे.

मी आणि माझे काही मित्र छत्तीसगड राज्याच्या सफरीवर गेलो होतो. इंटरनेटच्या जंजाळातून छत्तीसगड राज्याची जुजबी माहिती मिळवली होती. सफारी साठी छत्तीसगड राज्याच्या पर्यटन विभागाशी संपर्क साधला होता. त्यांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करून सफरीचा कार्यक्रम ठरवला आणि प्रस्थान केले. छत्तीसगड राज्याचे रायपुर हे राजधानी शहर भारतातील सर्व शहरांशी रेल्वे, विमान व उत्तम महामार्गानीजोडलेले आहे. रायपुरचे विवेकानंद विमानतळ अद्यावत आहे.विमानतळाच्या आजूबाजूचापरिसरडोळ्यात भरणारा आहे. अनेकांना छत्तीसगड राज्यातील पर्यटन विषयी माहिती नसल्यामुळे येथे तुरळक प्रवासी येतात. विमानतळावर उतरल्यावर छत्तीसगड राज्याच्या पर्यटन विभागाचे अधिकारी आम्हाला भेटण्यास आले. बरोबर उत्तम कापडी पिशवीत राज्यातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती पत्रके, उत्तम फोटो असलेली पुस्तकेआम्हाला भेट दिली. सरकारी अधिकारऱ्यानें आमच्याशीप्रेमाने बोलणे सुरु केले. अधिकारी आमच्याशी आदराने माहिती सांगत होते. त्यांच्या आदबशीर बोलण्याने मनात आपली छत्तीसगड राज्याची भटकंती चांगली होणार अशी खात्री झाली. पर्यटन करतांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन छत्तीसगड राज्याच्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. सर्व भटकंतीतछत्तीसगड राज्यातील पर्यटन विभागातील कर्मचाऱ्याच्या आदबशीर आणि प्रेमळ वागणुकीचा अनुभव आम्हाला आला. आपल्या प्रांताचा विकास कसा करवा ह्याचे शिक्षण आम्हाला ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कडून मिळाले.

विमानतळ ते रायपुर शहरा पर्यंतचा  १५ किमी रस्ता, अगदी परदेशात प्रवास करत आहोत असे वाटत होते. त्याला साजेशी उत्तम टॅक्सी आणि विश्वास बसणार नाही इतके आदराने बोलणारे चालक, पर्यावरणाचे महत्व दाखविणारी अनेक रंगीत चित्रे जागोजागी भिंतीवर रंगवलेली होती. पुलाचे खांब सुद्धा चित्रमय होते.रायपुर शहराची स्थापना कलचूरीराजारामचंद्र यांनी १४ व्या शतकात केली. त्यांचा  पुत्र ब्रम्हदेव ह्यांने रायपुर नामकरण केले १६ व्या शतकात मराठा साम्राज्याचा  विस्तार रायपुर पर्यंत झालाहोता. या सर्व प्रदेशाचे नांव छत्तीसगड असे पडले(३६ किल्ले त्या काळात असावेत.) शहराची  जुनी वस्ती ५०० वर्षापुर्वीची आहे.रायपुर शहरात देवी कालीचे दगडातील मंदीर सर्वात जुने आहे. शहराच्या एका भागात रेडिओ स्टेशन आहे.  शहराच्या मध्यात आकर्षित करणारा बूढा तलाव ( विवेकानंद लेक), ह्या तलावच्या मध्यात विवेकानंदांचा भव्य पुतळा असून,तेथे जाण्यास  उत्तम फरसबंदी रस्ता आहे. तलावाच्या दोन्ही बाजूनी झाडे लावलेली आहेत. हा परिसर रात्रीच्या प्रकाशझोतात उजळून निघतो.विवेकानंदांनी बालपणातील काही काळ(१८७७-७९) येथे व्यतीत केला होता. या भागातील जंगल आणि मनाला मिळणारी शांती यामुळे विवेकानंद या शहराच्या प्रेमातच पडले.विवेकानंदांच्या पावन स्मृती जतन करण्यसाठी त्यांच्या जन्म शताब्दीच्या निमीत्ताने  रामकृष्ण मिशनची स्थापना रायपुर शहरात केली गेली.

दुधाधारी मठ आणि राम मंदीर,१६१० सालात बांधला.या परिसरात बलभद्र दासनावाचे राम भक्त रहात होते. हे  महान ॠषी बलभद्र दास  फक्त दूध सेवन करीत(दूध आहारीम्हणून दूधाधारी ) राम मंदिराच्या गाभाऱ्यातराम लक्ष्मण सीता यांच्या दागिन्यांनी मढवलेल्या बघत रहाव्यात अशा मूर्तीआहेत. देवळातील भिंती व  खांब यावर रामायणातील अनेक प्रसंग दाखविणारी अतिशय उत्तम पद्धतीने काढलेली५०० वर्षापूर्वींचीरंगीत तैल चित्रे आहेत. हीचित्रे आजही त्यांचा ताजेपणा टिकवून आहेत.परिसर मोठा,फरसबंदी उत्तम चकाकणाऱ्या रंगीत दगडाची आहे.येथील स्वच्छता तर डोळ्यात भरणारी आहे.

जुन्या रायपुर मधील महामाया मंदीर ( महिषासुर मर्दिनी,आणि जगदंबा ) फार पुरातन असून तिला शक्ती, शिव आणि विष्णू पासून मिळाली आहे असे सांगितले जाते. रायपुर मधील ज़ैतू साउ मठ बांधण्यास ७ वर्षे लागली. हा मठ बांधण्यासाठी जयपूर येथून उत्तम मजूर व कारागीर आणण्यात आले होते ( स्थापना १८७७ ) प्रसिद्ध स्वातंत्र्य लढवय्ये व विद्वान लक्ष्मी नारायण दास यांचे कार्यालय याच मठात होते.महात्मा गांधी व नेहरू येथे भेट देत असत.सदर बझार मधील जगन्नाथ मंदीर जुने असून ते १८६० मध्ये बांधले गेले.रथयात्रा हे या मंदिराचे प्रमुख आकर्षण असते.

कैसर ए हिंद दरवाजा, जय स्तंभराणी विक्टोरिया (Queen Victoria)च्या स्मरणार्थ १८८७ मध्ये उभारण्यात आला.तसेच विक्टोरिया सभागृह (Victoria jubelle hall टाउन हॉल म्हणून ओळखला जातो)बांधले.ह्याचे बांधकाम करण्या करता रायपुर किल्ला बांधण्यास जे दगड वापरले होते तेच वापरण्यात आले आहेत.

महंत घासीदास यांच्या स्मरणार्थ बांधलेले रायपुर वस्तुसंग्रहालय (म्युझियम) भारतातील एक प्रसिद्ध जागा म्हणून गणली जाते.कालाचुरी शिल्पकला, युद्धात वापरण्यात येणारी विविध शस्त्रे, बुद्धाच्या मूर्तीव संपूर्ण छत्तीसगड राज्याचा इतिहास फार आकर्षक पद्धतीने ह्या वास्तू संग्रहालयात दाखविलेला आहे.

हटकेश्वर महादेव मंदीर आणि महादेव घाट म्हणजे कालीचुरी राज्याच्या वारसाचे स्थान आहे.या ठिकाणी बोटिंगची सोय आहे.  सोलर कोल्ड खोल्या, असे अनेक प्रकल्प आहेत.

छत्तीसगड राज्य अक्षय उर्जा प्राधिकरण (क्रेडा) ह्या  संस्थेतर्फे रायपुर येथे “सौर उर्जा उद्यान” ही २० एकरात उभारलेली जागा म्हणजे अक्षय सौर उर्जेचे विश्वच उभारलेले आहे. येथे सौर उर्जेवर चालणारे पाणी उपसण्याचे पंप,पाणी सिंचन योजना,गरम पाणी पुरविण्यासाठी टाक्या,भाज्या फळे ठेवण्यासाठी सौर शीतगृहे,मोठ्या आकारच्या सौर उर्जा निर्माण करण्याचे जनित्र ज्यांच्या मुळे संपूर्ण गावास वीज पुरवठा होऊ शकेल अशा अनेक प्रकल्पांची माहिती येथे बघता येते. ह्या सौर उर्जा केंद्रात भरपूर माहिती  तक्ते, छत्तीसगड राज्यात ज्या  जागी या गोष्टी उभारलेल्या आहेत त्यांची माहिती मिळते. हा सर्व प्रकल्प  हिरव्या गार वनश्रीत पसरलेला आहे.प्रकल्पाच्या परिसरात जागोजागी विविध रंगाच्या गुलाबांचे ताटवे,उत्तम फरशी लावलेले  चालण्याचेरस्ते,एका कोपऱ्यात मोठा तलाव आहे. ह्या तलावात  बोटिंगची सोय आहे. तलावाच्या  पलीकडच्या काठावर पसरलेले राजीव गांधी वनउद्यान हे जंगलाची निस्सीम शांतता अनुभवण्याचे ठिकाण आहे. ह्या प्रकल्पात एका बाजूला लक्ष्मण झुला आरामात बसण्यास कॉफी शॉप आहे. कॉफी शॉप मध्ये  तुरळक गर्दी असते. हा सौर  प्रकल्प  म्हणजे रायपुर शहराची शान असलेली जागा आहे.

शदाणी दरबार तीर्थ रायपुर पासून १० किमी अंतरावर असलेल्या पिठाचा इतिहास ३०० वर्षांचा जुनाअसून शदाराम साहिब ( १७०८ ते १७९३ )या सिंधी गुरुंनी सिंध प्रांतात या पीठाची स्थापना केली.शदाराम साहिब यांचे भक्तगण कोणत्या एका धर्माचे नसून समाजाच्या सर्व स्तरातील भक्तगण मन:शांती करता भारत व परदेशातून या जागेला भेट देण्यास येत असतात.हा सर्व परिसर स्वर्गाहूनही पवित्र व सुंदर आहे अशी भक्तांची धारणा आहे. २० ते २२ एकरात पसरलेल्या या मंदीर परिसराच्या प्रवेषद्वारातून आत शिरताच आपण एका उदात्त अती भव्य तीर्थ पाहतो असे वाटते आणि ते पहाताना मति गुंग होते.

शदणी दरबार तीर्थ येथे भारतीय परंपरेतील प्रत्येक ॠषीचे ध्यानात बसलेले अतिशय बोलके पुतळे बसविले आहेत. प्रत्येक पुतळ्याखाली त्या ऋषींची नांवे कोरलेली आहेत.व्यास व गणपती ह्यांचे महाभारत लिहितांना केलेले पुतळे अप्रतिम आहेत.संपूर्ण परिसरात मोठाले वृक्ष,फुलांचे ताटवे,जागोजागी रामायण,महाभारतातील अनेक प्रसंग चित्रित केलेले भव्य रंगीत पुतळे,अनेक प्राणी व गायींचे मंत्रमुग्ध करणारे पुतळे आहेत.प्रत्येक कलाकृती पाहता पाहता डोळे आनदाने भरून जातात.मुख्य दरबाराच्या भव्य हॉलमध्ये एका टोका पासून ते शेवटापर्यंतलाल जाड मखमली गालीचा पसरलेला आहे. मुख्य दरबाराच्या भव्य हॉलच्या दोन्ही भिंतीवर तेथे होणाऱ्या समारंभांची व धर्मगुरूंची रंगीत तैलचित्रे लावली आहेत.मुख्य दरबाराच्यामध्यात शदाराम गुरुंची समाधी व त्याच्या बाजूनी ८ सिंधी गुरूंचेसंगमरवरी पुतळे उभारलेले आहेत. एका खुर्चीत सध्याचे गुरु बसलेले असतात. येणारे प्रत्येक भाविक नमस्कार करत आशीर्वाद घेत होते. पराकोटीची शांतता, व स्वच्छता ह्या दरबारात अनुभवास येते. आपल्यालास्वर्गाच्या दालनातून फिरत आहोत असे वाटत असते.शदणी दरबार तीर्थाचे संपूर्ण बांधकाम अतिशय उत्तम प्रतीचे आहे. येथे राहण्यासाठीअनेक खोल्या, संस्थेतर्फे गोशाळा,मोफत मेडीकल सेवा,गरीब जनतेकरता विना शुल्क भूमी वितरण असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात.भाविकांच्या सर्व चिंता दूर करणारे हे पीठ छत्तीसगड राज्याचा अनमोल ठेवा आहे.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..