कुठलाही संघर्ष किंवा कुठलेही भांडण घ्या, थोडे खोलात गेले तर लक्षात येते की ही केवळ अहंकाराची, श्रेष्ठत्वाची लढाई आहे. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर शिवसेना आणि मनसेतील संघर्षाचे घ्यावे लागेल. या संघर्षाकडे पाहणारा कोणताही त्रयस्थ माणूस हेच म्हणेल की ही सगळी मारामारी राज आणि उद्धव यांच्यातील अहंकाराची आहे. दोघांनाही दुसऱ्याची रेषा मोठी झालेली खपत नाही. त्यांच्या या वैयत्ति*क संघर्षात भरडला जात आहे तो मराठी समाज.
सृष्टीच्या क्रमिक विकासात मानवाने बुद्धिच्या प्रांतात इतर प्राण्यांवर मात करीत संपूर्ण जीवसृष्टीवर आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले. बुद्धिच्या वरदानाने मानवप्राणी इतर सगळ्यांच्याच तुलनेत खूप पुढे निघून गेला. इतर प्राणीमात्रांना जगण्यासाठी किंवा आपल्या प्रजातीचे अस्तित्व कायम राखण्यासाठी जशी जीवघेणी लढाई सतत लढावी लागते तशी मानवाला लढावी लागत नाही. इतर कोणत्याही जीवजंतूंपासून मानवाला कुठलाही धोका नाही आणि तसा धोका निर्माण झालाच तर आपल्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर तो धोका लिलया परतवून लावता येईल. परंतु याचा अर्थ मानवाला संघर्ष करावाच लागत नाही, असेही नाही. दुसरे कुणी शत्रू नसले तरी मानवाने आपसातच इतके मोठे भेद निर्माण करून ठेवले आहेत की दुसऱ्या शत्रूंची उणीव जाणवतच नाही. असे शत्रू निर्माण होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे तो बुद्धिसोबतच वाढलेला अहंकार किंवा दंभ! इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून मानवाची श्रेष्ठत्वाची भूक भागली नाही आणि जेव्हा इतर कुणी प्रतिस्पर्धी उरले नाही तेव्हा त्याने आपसातच प्रतिस्पर्धी निर्माण केले. या स्पर्धेतून मानवी अहंकाराचे पोषण होत गेले. आज मानवासमोर ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्यांच्या मुळाशी हा अहंकारच आहे. प्रत्येकजण स्वत:ला इतरांपे
्षा श्रेष्ठ समजतो आणि तसे सिद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. या प्रयत्नातूनच अनेक
प्रकारचे संघर्ष उभे राहत असतात. कधी धर्माच्या
नावावर, कधी जातीच्या नावावर, कधी न्यायाच्या बाजूने तर कधी अन्यायाच्या बाजूने, कधी सत्याच्या बाजूने तर कधी असत्याच्या विरोधात हे संघर्ष सतत सुरू असतात. या संघर्षांना लेबल कुठलेही असले तरी शेवटी तो संघर्ष असतो अहंकाराचा, श्रेष्ठत्वाच्या भावनेचा! बरेचदा अशा संघर्षात आपली बाजू मजबूत करण्यासाठी महापुरूषांच्या नावाचा आधार घेतल्या जातो. असा आधार घेतला म्हणजे आपल्या सुप्त महत्त्वाकांक्षांना सामाजिक आशयाची जोड देणे अगदी सहज शक्य होते, महापुरूषांच्या नावाने चार डोकी भडकवून आपली टोळी अधिक मोठी करता येते. धर्माचा आणि जातीचाही असाच वापर केल्या जातो. अशा राजकारणी डोक्यांनी आणि त्यांच्या अहंकाराने मानव जातीचे इतके प्रचंड नुकसान करून ठेवले आहे की बरेचदा मानवाचा बौद्धिक विकास झाला नसता तर बरे झाले असते, असे वाटू लागते. कुठलाही संघर्ष किंवा कुठलेही भांडण घ्या, थोडे खोलात गेले तर लक्षात येते की ही केवळ अहंकाराची, श्रेष्ठत्वाची लढाई आहे. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर शिवसेना आणि मनसेतील संघर्षाचे घ्यावे लागेल. या संघर्षाकडे पाहणारा कोणताही त्रयस्थ माणूस हेच म्हणेल की ही सगळी मारामारी राज आणि उद्धव यांच्यातील अहंकाराची आहे. दोघांनाही दुसऱ्याची रेषा मोठी झालेली खपत नाही. त्यांच्या या वैयत्ति*क संघर्षात भरडला जात आहे तो मराठी समाज. मुंबई-ठाण्यातील मराठी माणसांमध्ये या
दोघांच्या संघर्षामुळे उभी फूट पडली आहे. बाप सेनेत तर पोरगा मनसेत, अशी स्थिती घराघरात आहे. या संघर्षाचा शेवट शेवटी काय होणार? काय होणार याचे थोडक्यात उत्तर या लोकसभा निवडणुकीने दिलेच आहे, त्यातून या दोघांनी काही बोध घेतला नाही तर मुंबई-ठाण्या
ील मराठी माणसाची हिंमत पार ढासळेल, त्याच्यातील लढाऊबाणा नेस्तनाबूत होईल आणि पुढची शंभर वर्षे मराठी माणूस, जर तिथे टिकलाच तर मान वर करून चालण्याची हिंमत करणार नाही. हे टाळण्यासाठी राज आणि उद्धव या दोघांनीही दोन पावले मागे येऊन काहीतरी तडजोड करणे भाग आहे. आपला अहंकार कुरवाळण्यासाठी मराठी समाज दावणीला लावण्याचा अधिकार या दोघांनाही नाही. त्यांनी मराठी माणसाचे व्यापक हित लक्षात घेऊन एकत्र यायलाच हवे. बाळासाहेबांनी राज ठाकरेंना शिवसेनेत मानाने पाचारण करून मुंबई-ठाणे-नाशिक या भागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी आणि उर्वरित महाराष्ट्राचा भार उद्धव ठाकरेंच्या शिरावर द्यावा किंवा ग्रामीण व शहरी अशी विभागणी करून कार्याध्यक्ष ठाामीण व कार्याध्यक्ष शहरी, अशी पदे द्यावीत. बाळासाहेब ठाकरे जसे शेवटपर्यंत राजकीय पदांपासून दूर राहिले तसे या दोघांनीही शेवटपर्यंत ‘किंग मेकर’च्या भूमिकेत वावरावे. हे असे झाले नाही तर महाराष्ट्राचा मराठी आवाज कायमचा घोगरा होऊन बसेल. हे झाले राजकीय अहंकारातून निर्माण झालेल्या संघर्षाचे एक उदाहरण; परंतु अहंकाराला तेवढाच एक आयाम असतो असे नाही. नागर आणि ठाामीण संस्कृतीतला संघर्ष देखील अहंकाराचाच परिपाक आहे. आम्ही पुढारलेले आहोत आणि म्हणून आमचा अधिकार सर्वव्यापक आहे या अहंकारातून नागरी संस्कृतीने सातत्याने ठाामीण संस्कृतीचे शोषण केले आहे. हजारो वर्षांपासून हेच सुरू आहे. आज नक्षलवादाची जी समस्या आपल्यासमोर उभी ठाकली आहे त्या समस्येचे जन्मदाते आपणच आहोत. जंगलात, डोंगर-खोऱ्यात राहणाऱ्या अशिक्षित आदिवासींना शेकडो वर्षांपासून आपण लुबाडत आलो आहोत आणि आज लोकशाहीच्या युगातही तेच सुरू आहे. खरेतर जंगलावरचा पहिला अधिकार या आदिवासींचा आहे. त्यांचे पोट त्यावरच अवलंबून असते; परंतु जंगल संरक्षण कायद्यासारखे भंपक काय
दे करून आम्ही या आदिवासींच्या पोटावरच पाय दिला. तेंदुपत्ते सरकारचे, मोहाफुले साठवणुकीवर बंदी, लाखोळी विक्रीवर बंदी, गडचिरोलीतील काजू फळांच्या प्रक्रियेवरील बंदी, (गोव्यात मात्र फेणी) लाकडी शिल्पे बंदी, हरीण मारण्यावर बंदी, डुकरे मारण्यावर बंदी,जंगली मेवा, फळे, डिक जमा करण्यावर अंकुश! आदिवासंीनी जगावे
कसे, वस्तुस्थिती ही आहे की, या आदिवासींनी जंगलाचे जितक्या चांगल्याप्रकारे जतन केले होते किंवा
अजूनही करत आहेत, त्याच्या तुलनेत एक शतांश कामही शेकडो कोटींची उधळण करून पोसल्या जात असलेल्या वनखात्याकडून होत नाही. आदिवासी समाज निसर्गपूजक आहे. जंगलातील झाडे-झुडपे म्हणजे त्यांची देवता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पर्यावरणाची हानी होणे शक्यच नाही; परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणल्याने ते विवश झाले आहेत. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची अक्षरश: पिळवणूक केली जात आहे. किलोभर मिठाच्या मोबदल्यात किलोभर चारोळी आदिवासींकडून घेणाऱ्या, दहा-वीस रूपये त्यांच्या हाती टिकवून त्यांच्याकडून दिवसभर जीवतोड कष्ट करून घेणाऱ्या आणि स्वत:ला सुशिक्षित, पुढारलेले समजणाऱ्या लोकांना नक्षलवादाबद्दल बोलण्याचा हक्कच नाही. हा नक्षलवाद म्हणजे दुसरे-तिसरे काहीही नसून श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने पुढारलेल्या समाजाने शेकडो वर्षांपासून ज्यांच्यावर अन्याय केला, निव्वळ शोषणच केले त्या आदिवासींचा एल्गार आहे. हे आदिवासी किंवा त्यांच्या बाजूने लढणारे लोकच आज नक्षलवादी म्हणवल्या जात आहेत. हा नक्षलवाद संपवायचा असेल तर आधी हा सामाजिक, आर्थिक अन्याय संपवा, सगळी जंगले आदिवासींच्या हाती सोपवा, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या, त्यांच्या जीवनात विनाकारण ढवळाढवळ करू नका. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. नक्षलवाद्यांची हिंसा ह
नाण्याची एक बाजू असेल तर त्या नाण्याची दुसरी बाजू आदिवासींच्या मागासलेपणाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण करणारी व्यवस्था आहे. प्रत्येकाला समान अधिकार ही लोकशाहीची धारणा असेल तर ती धारणा समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविली गेली पाहिजे. दुर्दैवाने तसे होत नाही. आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकार कुरवाळण्यासाठी कुणालातरी कनिष्ठ समजणे आणि तसे सिद्ध करणे भाग असते. त्यातूनच हे शोषणाचे आणि सूड उगविण्याचे दुष्टचक्र अविरत फिरत राहते. कदाचित म्हणूनच तुकाराम महाराजांनी ‘बरे झाले देवा कुणबी झालो, अन्यथा असतो दंभी मेलो’, असे म्हटले असावे. खरेतर आता सगळ्यांनी ‘कुणबी’ व्हायला हवे. कुणबी म्हणजे आपल्या कर्तव्याशी, कष्टाशी प्रामाणिक असणारा सरळमार्गी माणूस; श्रेष्ठत्वाचा अहंकार त्याला कधी शिवत नाही!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply