नवीन लेखन...

अपान मुद्रा

मुद्रा शास्त्रात आरोग्यासाठी वेगवेगळ्या मुद्रा सांगितल्या आहेत. त्यातील अपान मुद्रा फार महत्वाची आहे. हाताच्या अंगठ्याचे टोक आणि मधले बोट व अनामिका ह्यांची टोके एकत्र जोडली की अपान मुद्रा तयार होते. ही मुद्रा कोणत्याही वेळी व कितीही वेळ केली तरी चालते. दोन्ही हातांनी किंवा न जमल्यास एका हाताने केली तरी चालते. सध्याचे जीवन बघता असे दिसते की: पुरेसा व्यायाम नाही, वाहनांच्या सुविधेमुळे शरीराची हालचाल कमी होते, आहार शांतपणे मन लावून घेतला जात नाही, आहार गरजेपेक्षा जास्त घेतला जातो, भूक लागल्यावर घेण्याऐवजी वेळ झाली म्हणून भूक नसताना देखील घेतला जातो, चमचमीत पदार्थ चवीसाठी भूक नसताना खाल्ले जातात. अशा प्रकारच्या स्वैर वर्तनाने आपल्या शरीरात टॉक्सिन्सची भरपूर साठवणूक होते आणि आपले आरोग्य बिघडते.

अपान मुद्रा केल्याने शरीरातील कोणत्याही प्रकारच्या मलाचे, विजातीय द्रव्याचे निचरा होण्याची क्रिया सहज वाढते व शरीर शुद्ध होऊ लागते म्हणजेच निरोगी होण्याला मदत होते.

१.      ही मुद्रा केल्याने शौच क्रिया सुधारायला मदत होते.

२.      छाती कफाने भरल्यावर ही मुद्रा केल्याने कफ पातळ होऊन खाली जात असल्याची जाणीव होऊन छाती मोकळी होते.

३.      अपचनामुळे जळजळ होत असल्यास ह्या मुद्रेने फायदा होतो.

४.      कुठल्याही प्रकारची सूज उतरवायला मदत होते.

५.      लाघवी साफ होण्यास मदत होते.

६.      ही मुद्रा केल्याने गुडघ्यावरील सूज कमी होऊन गुडघे दुखायचे थांबतात असा बरेच जणांचा अनुभव आहे.

७.      ही मुद्रा केल्याने हाय बी पी वाल्यांना फायदा झाला आहे.

८.      एका गृहस्थांचा डावा पाय वर पासून खाल पर्यंत सुजला होता. मी त्यांना अपान मुद्रा करायला सांगितली. एक महिन्यानंतर त्यांनी येऊन पाय दाखवला. पायाची सूज पूर्णपणे उतरून दोन्ही पाय एकसारखे दिसत होते.

९.      डास चावल्यावर तेथे आग होते. ती आग ही मुद्रा केल्याने थांबते असा माझा अनुभव आहे.

१०.  एका गरोदर बाईंना आठव्या महिना संपल्यावर ही मुद्रा करण्यास सांगितले त्या बाईंची डिलिव्हरी नॉर्मल झाली. त्यामुळे त्या बाई खुश होत्या.

११.  एका बाईनी ही मुद्रा केल्याने पित्ताचा त्रास गेल्याचे सांगितले.

१२. सोलापूरच्या एका बाईंनी फोन करून सांगितले की त्यांच्या पतीराजांचे क्रीयेटीनीन अठवड्यातून दोनदा डायलेसिस करूनसुध्दा गेले सहा महीने ११च रहात होत. तुमच्या पुस्तकांत दिल्या प्रमाणे मी गेले एक महीना त्यांना जास्तीत जास्त अपान मुद्रा करायला लावली. ह्यामुळे त्याचे क्रीयेटीनीन एक महीन्यात ४ वर आले. तुम्हाला धन्यवाद.

ही मुद्रा केल्याने शरीरशुद्धी होत असल्याने कॅन्सर सारखे आजार न होण्यास मदत होऊ शकेल असे मला वाटते.

अरविंद जोशी
९४२१९४८८९४

हा लेख वाचून काही शंका असल्यास जरूर फोन करावा.

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..