नवीन लेखन...

सेन्सॉर बोर्डच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले यांचा जन्म ६ ऑगस्ट रोजी झाला.
अपर्णा मोहिले हे सुपरिचित नाव आहे. मॅट्रिकला बोर्डामध्ये मुलींमधून पहिल्या आलेल्या ह्या हुशार विद्यार्थीनीने पुढे बी.ए., एम.ए. परीक्षांमध्येही चांगले यश मिळवले. अपर्णा मोहिले या १९६५ बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी बनल्या.त्यांची पहिली निवड इंडीयन पोस्टल सर्व्हीस मध्ये झाली. अशा प्रकारची निवड होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला अधिकारी होत्या. पोष्टातील अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली. चीफ पोस्ट मास्तर जनरल, पोस्टल सर्व्हीस डायरेक्टर, पोष्टल सर्व्हीसेस बोर्ड मेंबर अशा महत्वाच्या पदांवर काम करून त्यांनी ठसा उमटविला.

भारत स्वतंत्र झाल्यावर मात्र माहिती आणि प्रसारण मंत्र्याच्या अधिकारात १९५१ साली चित्रपट परीक्षण बोर्डाचे काम चालू झाले.कायम चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेले बोर्ड अशी याची ख्याती आहे. या बोर्डावर अनेक मान्यवर येवून गेले. बऱ्या वाईट प्रमाणात सर्वांच्या कारकिर्दीत काही कटू गोड घटना घडल्या. अलीकडे कलावंताची या बोर्डाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक कली जाते पण पूर्वी आय ए एस श्रेणीचा अधिकारी तिथे असायचा. हे अधिकारी मग डॆप्युटेशन वर काही कालावधीसाठी तिथे जायचे. चित्रपट, नाटक, संगीत याची अपर्णा मोहिले यांना पहिलेपासूनच आवड होती. त्या संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या तीनही विषयात विद्या पारंगत होते. काही काळ त्यांनी इंग्रजी या विषयाचे नागपूर च्या महाविद्यालयात अध्ययन केले होते.

साहित्यिक , सांस्कृतिक आवड होतीच. त्यामुळे त्यांनी पदाकरीता डॆप्युटेशन वर जाण्याची विनंती कली. आणि लगेच त्यांची विनंती मान्य होवून सी बी एफ सी वर रिजनल ऑफिसर म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत या क्षेत्रातील अनेक नामवंत होते. विजया मेहता, वंदना विटणकर,शांता शेळके होत्या. १९७८ ते १९८३ या पाच वर्षाच्या कालावधीत अपर्णा मोहिले या प्रशासकीय अधिकारी या बोर्डावर होत्या. पाच वर्ष इतका मोठा काळ इतर कोणत्याही अधिकाऱ्याला या पदावर रहाता आले नाही पण अपर्णा मोहिले मात्र तब्बल साडेपाच वर्ष या पदावर होत्या.

अपर्णा मोहिले १९८२-१९८३ या काळात त्या फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षा होत्या. तसेच १९९७-९८ या काळात त्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल होत्या. ३१ ऑगस्ट २००२ ला त्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या. एकदा अपर्णा मोहिले यांना प्रश्न विचारला गेला की पोस्टासारख्या रूक्ष खात्यात कशा काय रूळल्या? यावर त्यांचे उत्तर होते ” पोष्ट खाते रूक्ष मुळीच नाही उलट ते भावनासंपन्न आणि रसाळ आहे!’ निवृत्तीनंतर त्या पुण्यातच रहातात.

साहित्य, संगीत याची आवड असलेल्या अपर्णा मोहिले यांनी ‘संसार आणि सेन्सॉर (ललित)’ , ‘त्रिदल (नाटिकासंग्रह)’ , ‘शब्दपुष्पांजली (कवितासंग्रह)’ आणि ‘सेन्सॉर जीवनसार आणि मी (आत्मचरित्रपर)’ ही पुस्तके लिहिली आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..